शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पाहिले नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र; जांबे परिसरात ‘पवनामाई उगम ते संगम’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:54 IST

हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने आच्छादलेली पाहण्याची सवय असणाऱ्या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रूप पाहायला मिळाले. जांबे परिसरात घाटावरती पवना स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देअभियानाचा ७८वा दिवस, काढून टाकण्यात आली पाच ट्रक जलपर्णीयेत्या २८ जानेवारीला रावेत बंधाऱ्यावर जलपर्णी काढण्याचा उपक्रम : दीपक वाल्हेकर

पिंपरी : हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने आच्छादलेली पाहण्याची सवय असणाऱ्या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रूप पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला मुठा नदीपात्र मात्र जलपर्णीने पूर्ण आच्छादलेले आहे. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांच्या पवनामाई उगम ते संगम नदी स्वच्छता अभियानामुळे पवना नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र नागरिकांना पाहायला मिळत आहे. जांबे परिसरात घाटावरती पवना स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा अभियानाचा ७८वा दिवस होता. या वेळी पाच ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. आजअखेर ३२५ ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. संस्कार प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते व शिवाजी मोरे आणि मित्र परिवार हे कार्यकतेर्देखील आजच्या उपक्रमात सामील झाले. तसेच लेवा पाटील संस्थेच्या महिला आणि जामगावात महिला व स्थानिक ग्रामस्थ व रोटरीचे सर्व सदस्य सामील झाले होते. मुळा-मुठा नदी सांगवी येथेही जलपर्णीने पूर्ण भरलेली आहे. ही सत्य परिस्थिती आहे; परंतु पिंपरीपासून दापोडीपर्यंत पवना नदी पूर्णपणे जलपर्णीमुक्त आहे. आम्ही गेले काही दिवस रोज करीत असलेल्या कामाची ही खरी पावती आहे, असे समाधान संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब वाल्हेकरवाडी प्रदीप वाल्हेकर यांनी व नदीवर प्रत्यक्ष काम करणारे सोमनाथ मुसुडगे यांनी व्यक्त केले. तर हा पॅटर्न परिणामकारक वाल्हेकरवाडी पॅटर्न प्रशासनाने लवकरात लवकर अमलात आणावा, अशी अपेक्षा वाल्हेकर यांनी व्यक्त केली. अभियानाच्या शेवटाकडे जाताना जास्तीत जास्त लोकांनी यांच्यामध्ये सहभागी व्हावे. नदी स्वच्छतेचे काम केवळ रविवारी नाही तर दररोज काही कामगार जलपर्णी काढण्याचे काम करीत आहेत. तर दर रविवारी आवर्जून आम्ही लोकही नदी काठावर जमतो. ज्यामध्ये येत्या २८ जानेवारीला रावेत बंधाऱ्यावर जलपर्णी काढण्याचा उपक्रम केला जाणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे सचिव दीपक वाल्हेकर यांनी सांगितली.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड