शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाखाची लाच; ‘एपीआय’सह तिघांना पकडले

By नारायण बडगुजर | Updated: June 17, 2023 21:26 IST

महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी

पिंपरी : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय), एक पोलिस कर्मचारी व एका खासगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण निगडी येथे शनिवारी (दि. १७) ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले.   

सहायक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलिस कर्मचारी  सागर तुकाराम शेळके, खासगी इसम सुदेश शिवाजी नवले (वय ४३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४८ वर्षीय महिलेने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला हातउसणे व बँकेमधून कर्ज काढून पैसे दिले होते. मात्र, बँकेच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने तक्रारदार महिलेने उसणे दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने तक्रारदार ४८ वर्षीय महिलेच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीकामी सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोरडे याच्याकडे होता. तक्रारदार महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक निरीक्षक कोरडे, पोलिस कर्मचारी सागर शेळके व खासगी इसम नवले यांनी तक्रारदार महिलेकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी कली. याबाबत तक्रारदार ४८ वर्षीय महिलेने ‘एसीबी’कडे तक्रार केली. त्यानुसार ‘एसीबी’ने महिलेच्या तक्रारीची पडताळणी केली.

सहायक निरीक्षक कोरडे व पोलिस कर्मचारी शेळके यांच्यावतीने खासगी इसम नवले याने दीड लाख रुपयांची लाच मागणी केली व नवले याने केलेल्या लाच मागणीस सहायक निरीक्षक कोरडे व पोलिस कर्मचारी शेळके यांनी दुजोरा देऊनन सहाय्य केल्याचे समोर आले. त्यानुसार ‘एसीबी’ने शनिवारी सापळा रचला. त्यावेळी लाचेची दीड लाखांची रक्कम नवले याने स्वीकारली. त्यानंतर ‘एसीबी’ने तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.‘एसीबी’च्या पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले, निरीक्षक प्रवीण निंबाळकर, हवालदार नवनाथ वाळके, पोलिस कर्मचारी सौरभ महाशब्दे, शिल्पा तुपे, पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.