शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेश देऊन नऊ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 01:12 IST

कार्यालयाच्या बांधकामासाठीची ठरलेली रक्कम न देता एका बांधकाम व्यावसायिकाची नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी येथे घडली.

पिंपरी : कार्यालयाच्या बांधकामासाठीची ठरलेली रक्कम न देता एका बांधकाम व्यावसायिकाची नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अकीब नत्रे खान (वय २६, रा. कामगारनगर, पिंपरी) यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी मनीष वर्मा (रा. गोरेगाव, मुंबई), संकेत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि मौलाअली गुलामरसुल मुल्ला (रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांच्याशी त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम करण्यासंबंधी १० आॅक्टोबर २०१५ रोजी करार केला. करारनाम्यानुसार कार्यालयाचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासह या कामाचे १४ लाख २५ हजार रुपये इतकी रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार तिघे आरोपींनी सव्वादोन लाखांचा आगाऊ धनादेश १० आॅक्टोबरलाच दिल्याने अकीब खान यांनी त्या दिवशीच कार्यालयाच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान, ११ डिसेंबरला ९० टक्के काम पूर्ण झाल्याने खान हे कामाचे पैसे मागण्यासाठी गेल्यावर त्यांना दोन धनादेश दिले. मात्र, ते वटले नाहीत. यासंबंधी त्यांनी आरोपींकडे विचारणा केल्यावर त्यांनी काम पूर्ण झाल्यावर पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार काम पूर्ण झाल्यानंतर एक लाखाचे चार धनादेश खान यांना दिले. मात्र, चारही धनादेश वटले नाहीत. यावर खान हे पैसे मागण्यासाठी पुन्हा आरोपींकडे गेले असता, त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, झालेल्या कामाचे पैसे न देता ९ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनयभंग करणाऱ्यास अटकपुणे : चाकूचा धाक दाखवून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. मुलीच्या आईने या संबंधी फिर्याद दाखल केली होती. आकाश गणेश झरक (वय १९, रा. गणेशनगर, साडेसत्तरानळी, हडपसर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मागील १ वर्षापासून तो संबंधित मुलीला त्रास देत होता. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या महाविद्यालयीन तरुणास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)