शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते विकासासाठी नऊ कोटी; विविध प्रकल्पांच्या कामांसाठी ४० कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:25 IST

शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांच्या सुमारे ४० कोटी ५३ लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. वडाचा मळा विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे नऊ कोटी ७९ लाख १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

पिंपरी : शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांच्या सुमारे ४० कोटी ५३ लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. वडाचा मळा विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे नऊ कोटी ७९ लाख १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संत तुकारामनगर, महेशनगर चौक ते अग्निशामक चौक पर्यायी रस्ता, उपरस्ते विकसित करण्यासाठी ३८ लाख ६१ हजार रुपये खर्च होणार आहे. ग प्रभागात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेले खोदकाम बुजविणे, एमपीएम, बीएम व बीसी पद्धतीने डांबरीकरण करणे यासाठी चार कोटी १३ लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातून संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाºया १८ मीटर डीपी रस्त्यास सबवे करणे, ताब्यात येणारा १२ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करणे या कामासाठी सात कोटी ३२ लाख ७२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सांगवी-किवळे रस्त्यावर सांगवी फाटा येथे ढोरे पाटील सब वे ते औंध परिहार चौक पुलापर्यंतचा विकास आराखड्याप्रमाणे रस्ता विकसित करण्यासाठी सुमारे सात कोटी २० लाख १० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यासह ड प्रभागात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केल्याने झालेले चर एमपीएम, बीएम व बीसी पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी ३२ लाख ३६ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. ड प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी सुमारे चार कोटी ३७ लाख दोन हजार खर्च अपेक्षित आहे. अशा पद्धतीच्या रस्ते विकासाच्या कामांच्या खर्चास मान्यता दिली.रहाटणीत वेटिंग शेडसाठी २ कोटी १५ लाखरहाटणी गावठाण येथील स्मशानभूमीमध्ये वेटिंग शेड बांधण्यासह स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे दोन कोटी १५ लाख २० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. या शिवाय अन्य विकासकामांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड