शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षाच्या जेष्ठ नागरिकास पळविले, एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:04 IST

खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरून काळूस ( ता.खेड ) येथील ७० जेष्ठ नागरिकाचे अपहरण

चाकण / काळुस : खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरून काळूस ( ता.खेड ) येथील ७० जेष्ठ नागरिकाचे अपहरण केल्याची घटना घडली असून जेष्ठ नागरिकाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून काळूस येथील एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार नामदेव जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना ११ मे रोजी सकाळी ८ वाजून १ मिनिटांनी काळूस गावच्या हद्दीत घडली. सोनबा गोविंद खैरे ( वय ७० ) यांचे अपहरण केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा काळुराम सोनबा खैरे ( वय ३६, रा. काळूस ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजय मारुती खैरे ( रा. काळुस, ता.खेड, जि. पुणे ) याचेवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७४/२०१८, भादंवि कलम ३६४ नुसार आज ( दि. १८ ) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, ११ तारखेला सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सोनबा गोविंद खैरे यांना आरोपी संजय मारुती खैरे याने काळूस गावच्या खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये त्याच्या बरोबर सभासद होत नसल्याचा राग मनात धरून स्कॉर्पिओ गाडी क्रमांक ( एम एच १४ - डीए - ५३५३ ) यामध्ये बसवून पळवून नेले आहे. चाकण पोलीस ठाण्यात या अगोदर सोनबा खैरे हे बेपत्ता झाल्याची खबरही देण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हरगुडे पुढील तपास करीत आहेत