शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दहशतीच्या घटनांत ६० जणांवर ‘मोक्का’

By admin | Updated: November 30, 2015 01:48 IST

दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पिंपरी : दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आठ महिन्यांत ६० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांनी दिली.पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांत स्थानिक गुन्हेगारांकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडले. नंग्या तलवारी, शस्त्र घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविणे, वाहनांची तोडफोड करणे, घरांवर दगडफेक अशी कृत्य करणाऱ्या टोळक्यांना पोलिसांनी चपराक दिली आहे. नेहरूनगर, मिलिंदनगर, आकुर्डी या परिसरातील स्थानिक गुंडांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. नेहरूनगरमधील वीटकर टोळी, रिंकू चौहान टोळी, तसेच आकुर्डीतील सोन्या काळभोर टोळीतील गुंडांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. भोसरीत धुडगूस घालणाऱ्या सोन्या काळभोर टोळीतील २२ गुंडांवर एकाच वेळी मोक्काअंतर्गतची कारवाई करण्यात आली. आठ महिन्यांत अशा प्रकारे ६० गुन्हेगारांना मोक्का लावला आहे. शहरात स्थानिक पातळीवर संघटितपणे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांमुळे सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोहोचू लागली आहे. त्यामुळे परिमंडल तीन पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या अखत्यारित आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य दिले आहे. स्थानिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने संघटित गुन्हेगारीची दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वचक बसली आहे, असे विधाते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)