शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी दिले ५१ हजार

By admin | Updated: April 7, 2016 00:36 IST

बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या सुनीता पवार या महिलेवर विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमावण्याची वेळ आली.

पिंपरी : बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या सुनीता पवार या महिलेवर विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमावण्याची वेळ आली. लोकमतने तिची संघर्षमय जीवनगाथा उलगडल्यानंतर समाजातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. भारतीय जनता पक्षाच्या पिंपरीतील कार्यालयात ३६व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जमा केलेला ५१ हजारांचा मदतनिधी तिच्याकडे सुपूर्द केला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. भाजपाच्या सांगवी- चिंचवड मंडलच्या कार्यकर्त्यांनी महिलेला देण्यासाठी निधी जमा केला. संजय गांधी निराधार योजना समितीचे गोपाळ माळेकर, तसेच अरुण पवार, शिवाजी खुळे, अनिल नखाते, संजय मरकड, जवाहर ढोरे, राज तापकीर, माधव मनोरे, चंद्रकांत नखाते, दीपक नागरगोजे, गणेश नखाते यांनी पुढाकार घेऊन अपंगत्व आलेल्या महिलेला मदतीचा हात दिला. भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक़्रमास डॉ. गीता आफळे, अर्चना भालेराव, सीमा सावळे, आशा शेंडगे आदी उपस्थित होते. दोन्ही हात नसलेल्या सुनीता पवार यांना स्माइल प्लस सोशल फाउंडेशनच्या वतीने मदत जाहीर झाली आहे. पवार यांच्यासाठी दोन वेळचे जेवण, नाष्टा व धुणी-भांडी करण्याची जबाबदारी संस्थेच्या वतीने शांताई नगनूर या महिलेवर सोपविण्यात आली असून, संस्था या कामासाठी त्यांना दरमहा दोन हजार रुपये मानधन आणि किराणा माल देणार आहे, अशी माहितीसंस्थेचे अध्यक्ष योगेश मालखरे यांनी दिली. (प्रतिनिधी)जगण्यास मिळाले बळ : सुनीता पवारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन शासकीय स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष पाठवले. आस्थेने विचारपूस केली. २५ हजारांची मदतसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली. समाजातून मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. शासनानेसुद्धा तातडीने मदत दिली. त्यामुळे अपंगत्वामुळे दु:ख आले असले, तरी संकटसमयी समाज आणि शासनाकडून मिळालेली मदत मोलाची वाटते. जगण्यास आणखी बळ मिळाले आहे, अशा भावना सुनीता पवार यांनी व्यक्त केल्या.