शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून ५० शेळ्या-मेंढ्या ठार

By admin | Updated: June 13, 2017 04:10 IST

सुदवडी (ता. मावळ) हद्दीत श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला वीज पडून सुमारे ५० शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. १५ शेळ्या-मेंढ्या जखमी झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

देहूगाव/तळेगाव दाभाडे : सुदवडी (ता. मावळ) हद्दीत श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला वीज पडून सुमारे ५० शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. १५ शेळ्या-मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यात सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती कळताच सुदुंबरे गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब गाडे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार रणजीत देसाई व तलाठी मनीषा निंबोळकर यांना माहिती देण्यात आली. तलाठी निंबोळकर यांनी रात्री पावणेआठच्या सुमारास पंचनामा केला. भंडारा डोंगराच्या पायथ्याला बाळू गोपाळा शिंगटे व त्याचा भाऊ अंबू गोपाळा शिंगटे यांचा वाडा आहे. सायंकाळी शेळ्या व मेंढ्या चारून ते आपल्या वाड्याकडे चालले असता पाऊस सुरू झाला.कृषी अधिकाऱ्यांकडून होणार पाहणी निवाऱ्याला बाळू व अंबू आपल्या शेळ्या व मेंढ्यासह थांबले होते. प्रचंड प्रकाशाचा झोतासह वीज कडाडली आणि काही कळण्याच्या आत वीज पडली. उपसरपंच बाळासाहेब गाडे, सुदवडीचे सरपंच सदानंद टिळेकर, माजी सरपंच सुरेखा मोईकर,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कराळे, शांताराम दरेकर उपस्थित होते. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मंडल अधिकारी, कृषी अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी सकाळी नऊच्या सुमारास घटनेची पाहणी करण्यास येणार असल्याची माहिती गाडे यांनी दिली.