शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

पावसामुळे अडोशाला उभे राहिले अन् काळाने घाला घातला; डोक्यावर होर्डिंग कोसळले, ५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 22:45 IST

समीर लॉन चौक रावेत, अग्निशमन विभाग-सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांचे मदतकार्य, तीन तास मदतकार्य सुरू  

देवराम भेगडेकिवळे : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अडोशाला उभे राहिले अन् डोक्यावर होर्डींग कोसळले. त्यात पाच जणांचा बळी गेला आहे. तर दोन जण जखमी आहेत, ही घटना घडली आहे. बंगळुरू महामार्गावरील रावेतमध्ये. जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले. रात्री आठपर्यंत येथे वाहतूक कोंडी झाली होती. या भागातील वीजुपरठा खंडीत झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान वादळी पावसाने झोडपून काढले.  आज दानादान उडविली. त्यामुळे वाकड आणि किवळे, रावेत मधील झाडे उन्मळून पडली आहेत. पावसामुळे महामार्गावरून प्रवास करणाºयांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.

कोठेझाला अपघातबंगळुरू-मुंंबई महामार्गावरील पवनानदी सोडल्यानंतर सेवा रस्त्याने जाताना समीर लॉन चौकाच्या अलीकडे एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या प्रकल्पाकडून महामार्गावर येताना रस्त्यावर होर्डींग मागील बाजूस असणाºया एक हॉटेल आणि पंक्चरवाल्याची टपरी आहे. तेथील अडोशाला नागरीक उभे राहिले होते.

पंधरा मिनिटात पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक दाखलअपघात पाहणाऱ्या नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन विभागाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. तर देहूरोड आणि रावेत पोलीसांचे पथक पंधरा मिनिटात घटना स्थळी पोहोचले. तोपर्यंत पिंपरी-चिंचवडवरून चार बंब दाखल झाले. तसेच पीएमआरडीएचाही बंब दाखल झाला. होर्डींगचा सांगाडा मोठा आल्याने तो हटवायचा कसा, असा प्रश्न अग्निशमन विभागापुढे होता. त्यानंतर सुरूवातीला दोघांना बाहेर काढण्यात आले. आणि खासगी रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलविले.सामाजिक कार्यकर्ते सरसावले सेवा रस्त्यावरील होर्डींग हटविण्यासाठी क्रेनची आवश्यकता होती. मात्र, जवळच अरविंद सांडभोर यांचे क्रेनची सुविधा आहे. त्यानंतर चार क्रेन आणण्यात आले. तसेच आजूबाजूचे सामजिक कार्यकर्ते मदतीला धावून आले. त्यांनी गॅस कटरने सांगाडे तोडण्यास सुरूवात करण्यात आली.

पोलिस आयुक्तांनी दिली भेटघटनास्थळास सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी भेट दिली. तसेच घटनास्थळी असणाºया नागरीकांशी संवाद साधला. घटनेची माहिती घेतली. तसेच त्यानंतर पावणेआठच्या सुमारास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ यांनी घटनास्थळास भेट दिली.  

महामार्गावर वाहतूककोंडी  महामार्गालगत होर्डींग पडल्याने बघ्याची गर्दी मोठ्याप्रमाणावर झालेली होती. तर सेवा रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस निरिक्षक सुनील पिंजन, गणेश आदरवाडकर यांनी आणि कर्मचाºयांनी प्रयत्न केले.  

तीस बाय चाळी फुटाचे होर्डींग७० बाय ४५ फुटाचा बेस असून त्यावर तीस बाय चाळीसचे होर्डींग आहे. त्यासाठी जड लोखंड वापरले आहे.

महावितरणचा फोन बंदघटनास्थळापासून तीनशे मीटरवर महावितरणचे कार्यालय आहे. अपघात झाल्यानंतर या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी महावितरणकडे संपर्क साधला मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिवस मावळल्यानंतरही या भागात वीज नव्हती. अग्निशमन विभागाच्या गाड्याचे हेडलाईट लावून काम करण्यात आले. साडेआठच्या सुमारास मदतकार्य संपले. नऊपर्यंत येथील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

असा घटनाक्रमसायंकाळी सव्वा पाच -होर्डींग कोसळले.सायंकाळी साडेपाच वाजता-अग्निशमन दल, पोलीस दाखल, दोन जखमींना हलविले.सायंकाळी पावणे सहा -खासगी क्रेन पाचारण. लोखंड तोडून तिघांना बाहेर काढले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात हलविले.  सायकाळी सात वाजता-पोलिस आयुक्त घटनास्थळीरात्री साडेआठला-महापालिका अधिकारी.रात्री नऊवाजेपर्यंत-लोखंड हटविण्याचे काम सुरू.