शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘टेनिस’साठी ५ कोटींचा घाट, बालेवाडीत होणार आंतरराष्ट्रीय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:12 IST

महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनतर्फे बालेवाडीत महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता पिंपरी महापालिकेकडून पाच कोटींचा निधी देण्याबाबत घाट घातला जात आहे.

पिंपरी : महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनतर्फे बालेवाडीत महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता पिंपरी महापालिकेकडून पाच कोटींचा निधी देण्याबाबत घाट घातला जात आहे. हा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सहकार्याने डेव्हीस करंडक स्पर्धेचे फेब्रुवारी २०१७ ला बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले होते. चेन्नई येथे टेनिस स्पर्धा भरविणारी असोसिएशन आॅफ टेनिस प्लेअर्स (एटीपी) ही संघटना यापुढे या स्पर्धा चेन्नईत भरविणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनने ही जागतिक स्पर्धा बालेवाडीतील शिवछत्रपती क्र ीडा संकुलात घ्यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे राज्याचे नाव देशात तसेच लॉन टेनिस विश्वात घेतले जाईल.राज्यातील खेळाडूंनाही याचा फायदा होईल व खेळाचा प्रसारही होईल. याबाबी विचारात घेऊन महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनतर्फे एटीपी वर्ल्ड टूर सिरीज अंतर्गत महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन बालेवाडीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी बक्षिसाची रक्कम मुंबई मेट्रो रजिनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (एमएमआरडीए) यांनी द्यावी व उर्वरित निधीची उभारणी सरकारी, निमसरकारी संस्थांद्वारे करावी, असे नमूद केले आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचेही नाव आहे.मुख्यमंत्री कार्यालयातून पत्रया स्पर्धा सुरुवातीस पाच वर्षांकरिता आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव यांनी या स्पर्धेकरिता प्रतिवर्षी अंदाजे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पुढील पाच वर्षांकरिता प्रतिवर्षी एक कोटी रुपये इतके अनुदान देण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेकरिता प्रतिवर्षी एक कोटी याप्रमाणे पाच वर्षांकरिता पाच कोटी अनुदान देण्याबाबतचा विषय महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. मात्र, महापालिका नागरिकांच्या पैशातून हा निधी विकास कामांऐवजी स्पर्धेसाठी देऊ शकते का, हा कळीचा व अडचणीचा मुद्दा ठरणार आहे.