शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’ प्रकल्पासाठी ४८६ झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:24 IST

ग्रीन सिटीचा लौकीक असणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील ४८६ झाडे मेट्रो प्रकल्पासाठी काढण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी थेट परवानगी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हणमंत पाटील पिंपरी : ग्रीन सिटीचा लौकीक असणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील ४८६ झाडे मेट्रो प्रकल्पासाठी काढण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी थेट परवानगी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या या झाडांमुळे शहराचे पर्यावरण धोक्यात येणार आहे.महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनतर्फे स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड हद्दीतील हॅरीश ब्रीज ते पिंपरी महापालिका अशा ७ किलोमीटरचा पहिल्या टप्प्यात काम सुरू आहे. त्यामध्ये ६ मेट्रो स्थानके येणार आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने या महामार्गाच्या दुभाजकावर अनेक वर्षांपासून जोपासलेली झाडे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गाला अडथळा ठरत आहेत. त्यामध्ये पिंपळ, उंबर, चंदन, कडुनिंब, खाया व मोहगणी या देशी वृक्षांचाही समावेश आहे. महापालिकेचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यामध्येही शहरात प्रदुषण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे.उद्यान विभागाचे तीनदा जीवदानयाच महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणावेळी उद्यान विभागाने ही झाडे वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर बीआरटी प्रकल्पावेळी अशा पध्दतीने तीन वेळा ही झाडे वाचविण्यात उद्यान विभागाला यश आले. त्याप्रमाणे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात काही बदल केल्यास१५८ ऐवजी ३६ झाडे बाधितहोतील. १२२ झाडे वाचविण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने दिला होता. मात्र, महामेट्रोने हा प्रस्ताव धुडकावित १५८ तातडीने हलविण्याची मान्यता घेतली आहे. त्यासंबंधिचा पत्रव्यवहार ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.‘उद्यान’चा प्रस्ताव धुडकावलामहापालिकेच्या उद्यान विभागाने दुभाजकांच्या सुशोभिकरणासाठी झाडे, वेली व फुलांच्या विविध प्रजातींचे संवर्धन केले आहे. त्यामुळे या झाडांची वाट लावण्याऐवजी मेट्रोचा मार्गात बदल करण्याची सूचना आणि भरपाई म्हणून १९ लाख ६८ हजार रुपये देण्याविषयीचा प्रस्ताव उद्यान विभागाने महामेट्रोला दिला होता. मात्र, ही मागणी धुडकावित महामेट्रोने थेट आयुक्तांकडून झाडांचा अडथळा दूर करण्यासाठीची परवानगी मिळविली आहे.अशी आहे आयुक्तांनी दिलेली परवानगीमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या परवानगीनुसार हॅरीश ब्रीज ते पिंपरीच्या ग्रेडसेप्रेटरपर्यंत झाडांचा विस्तार कमी करणे, झाडांचे पुर्नरोपण करणे, झाडे पूर्ण काढून टाकणे अशी एकूण ४८६, तसेच दुभाजकांवरील सुशोभीकरणासाठी लावलेली फुलांची झाडे व वेल असा सुमारे ४ हजार ५६७ चौरस मीटरचा भाग पूर्ण काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ही परवानगी देताना सुशोभीकरणाचे पुर्नस्थापन करणे, वृक्ष काढताना वाहतूक, विद्युत तारा व इतर मालमत्तांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेण्याची अट आहे. काढलेल्या वृक्षाऐवजी प्रत्येकी १० वृक्ष लावण्यात यावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.