शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आचारसंहिता भंगाच्या मावळमध्ये २४१ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:42 IST

नागरिकांची सजगता वाढली; ऑनलाइन तक्रारीचे प्रमाण ९५ टक्के

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारी दाखल झाल्या असून, सर्वच तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. त्यात आॅनलाइन तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. २४१ तक्रारी आॅनलाइन आणि १२ तक्रारी आॅफलाइन दाखल झाल्या आहेत. निवडणुकीबाबत नागरिकांची सजगता वाढल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत.सर्वाधिक तक्रारी पिंपरी विधानसभेतआचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक तक्रारी पिंपरीत दाखल झाल्या आहेत. ९२ तक्रारी पिंपरीत तर त्यापाठोपाठ चिंचवडला ८२, मावळला ४४ आणि सर्वांत कमी तक्रारी पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच आॅफलाइन तक्रारी सर्वाधिक चार या पिंपरी विधानसभेत, चिंचवडमध्ये तीन आणि मावळ, उरणमध्ये प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारींवर कार्यवाही केली असून, सर्वच तक्रारी निकाली काढल्या आहेत. प्रलंबित तक्रारी अजिबात नाहीत.गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी अ‍ॅप विकसितनिवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना आॅनलाइन तक्रारी नोंदविण्यासाठी अ‍ॅप विकसित केले आहे. त्यावर नागरिकांच्या तक्रारी अधिक दाखल होत आहेत. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अ‍ॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करणे अपेक्षित आहे. तसेच आॅफलाइन तक्रारींची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.पथनाट्य, फेऱ्या या माध्यमांतून मतदारजागृती केली जात आहे. निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तसेच आॅनलाइन तक्रारी दाखल करण्यावर भर दिला आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघांत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सातव्या मजल्यावर कार्यालय सुरूकेले आहे.सुरुवातीच्या कालखंडात खोट्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, त्यांची तपासणी काटेकोरपणे होत असल्याने दुसºया आणि महत्त्वाच्या टप्प्यात खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तपासणीमुळे खोट्या तक्रारदारांना चाप बसणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaval-pcमावळ