शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

महापालिकेप्रमाणे प्राधिकरणात होणार २२ मजली टोलेजंग इमारती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 1:04 AM

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील इमारतीच्या उंचीसाठी ३६ मीटर उंचीचे बंधन होते.

- हणमंत पाटीलपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील इमारतीच्या उंचीसाठी ३६ मीटर उंचीचे बंधन होते. मात्र, महापालिकेच्या बांधकाम विकास नियमावलीत इमारतीच्या उंचीसाठी ६९ मीटरपर्यंतची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर प्राधिकरण क्षेत्रातही रस्त्याच्या रुंदीनुसार इमारतीची उंची वाढविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे नुकताच सादरकरण्यात आला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या क्षेत्रातही २२ मजली टोलेजंग इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.पिंपरी-चिंचवड शहराचा औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने विकास होत गेला. रोजगार व व्यवसायानिमित्ताने शहरात स्थलांतरित लोकसंख्या वाढली. तिला सामावून घेण्यासाठी जागा कमी पडू लागल्याने महापालिकेने बांधकाम विकास नियमावलीत बदल करून इमारतीच्या उंचीबरोबर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) व हस्तांतरणीय विकास हक्कामध्ये (टीडीआर) वाढ करण्यात आली. त्यामुळे एम्पायर सोसायटी परिसरातील उड्डाणपुलाभोवती टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. तसेच, महापालिका क्षेत्रात आरक्षण व रस्त्याच्या जागेच्या मोबदल्यात एफएसआय व टीडीआर देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात रस्ते, उड्डाणपूल व आरक्षणाच्या जागा विकसित होण्यास वेग आला आहे.दरम्यान, एकाच शहरात महापालिका व नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) यांची बांधकाम विकास नियमावली वेगवेगळी आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती व प्राधिकरण क्षेत्रात कमी उंचीच्या इमारती दिसून येतात. प्राधिकरण क्षेत्रात उंचीचे बंधन असल्याने नागरिकांचा अनधिकृत बांधकाम करण्याकडे कल वाढला आहे. शिवाय शहराचा असमतोल विकास होताना दिसत आहे. शहराचा एकजिनसी विकास होण्यासाठी महापालिकेप्रमाणेच प्राधिकरण क्षेत्रातील ३६ मीटर उंचीचे बंधन काढून जादा एफएसआय देण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी तयार केला आहे.>वाणिज्य वापरामुळे नवीन रोजगारप्राधिकरण क्षेत्रात इमारतीच्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर ६९ मीटर उंचीची इमारत बांधण्याविषयीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे प्राधिकरण क्षेत्रातील आरक्षणाच्या जागा विकसित होण्यासाठी निधी उपलब्ध होईल. त्यामुळे नाट्यगृह, उद्यान, पंचतारांकित हॉटेल, मॉल व मल्टिप्लेक्ससारख्या सुविधा निर्माण करता येणार आहेत. २४ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्याभोवती ३० टक्के मर्यादेत तळमजल्यावर प्राधिकरणाकडून हस्तांतरित व १२.५ टक्के परतावा असलेल्या भूखंडावर वाणिज्य वापर करता येणार आहे. त्यानुसार प्राधिकरण हद्दीतील भोसरी, चिखली, आकुर्डी व वाकड डिस्ट्रिक्ट सेंटर या चार प्रमुख पेठांमध्ये वाणिज्य वापर वाढणार आहे. त्यातून नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड