शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसालाच ‘बाळा’चा ‘कार’नामा..! अन् बचावासाठी धावले पोलिस ‘मामा’?

By नारायण बडगुजर | Updated: May 30, 2024 21:58 IST

थेरगाव येथील अपघात प्रकरणी दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल

पिंपरी: अठरावा वाढदिवस साजरा करत असलेल्या एका बाळाने भरधाव कार चालवून पार्किंग केलेल्या एका कारला धडक दिली. यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बाळाला आणि त्याच्याकडील कार मालकाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, याप्रकरणी दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. थेरगाव येथे मंगळवारी (दि. २८ मे) रात्री हा अपघात झाला.

दीपक लक्ष्मण दवणे (४३, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. ३०) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कार चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांची कार त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव चालवून फिर्यादी दीपक यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. यात दीपक यांच्या कारसह चालकाकडील कारचेही मोठे नुकसान झाले. पुण्यातील प्रकरणातून पोलिसांनी धडा घेतलाच नाही..पुण्यातील कल्याणीनगर येथील अल्पवयीन मुलाने वाहन चालवून झालेल्या अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच थेरगाव येथे हा अपघात झाला. यात कोणीही जखमी किंवा कोणाचा मृत्यू झाला नसला तरी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस लागले. पुण्यातील प्रकरणावरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडा घेतलाच नाही, असे थेरगाव येथील अपघात प्रकरणावरून दिसून येते. 

कारचालक अल्पवयीन की सज्ञान?

कारचालक बाळाचा २८ मे रोजी अठरावा वाढदिसव होता. वाढदिवसालाच त्याच्याकडून अपघात झाला. त्यामुळे तो अल्पवयीन आहे की सज्ञान, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, पोलिसांकडून आधारकार्ड, जन्म दाखला यासह कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. 

कारमालकाला वाचविण्याचा प्रयत्न?

कारचालक मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना कारमालकाने त्याच्या ताब्यात कार दिली. त्यामुळे या कारमालकावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मात्र, चौकशीकरून याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कारमालकाला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.   

डायल ११२ ला काॅल, पोलिस ठाण्यात नोंद नाही

अपघात झाल्यानंतर डायल ११२ या हेल्पलाइनवर काॅल करण्यात आला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी कारचालक तसेच कारमालक यांना पोलिस ठाण्यात आणले. मात्र, याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नसल्याचे तसेच अपघात झाल्याचीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

पोलिसांचे हातावर हात...

कारचालक आणि कारमालकाला पोलिस ठाण्यात आणले असतानाही त्याबाबत पोलिस ठाण्यात नोंद केली नाही. तसेच अपघात झाला असल्याचीही नोंद न करता पोलिस ठाण्यातील अधिकारी हातावर हात धरून होते. याबाबत ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यावेळी ड्युटीवर असलेल्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचा दबाव होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.     

थरकाप उडवणारा अपघात

कारचालकाने भरधाव कार चालवून पार्किंग केलेल्या कारला धडक दिली. त्यामुळे मोठा आवाज झाला. त्यावेळी तेथे तरुणी, तरुण तसेच शतपावलीसाठी बाहेर पडलेले नागरिक रस्त्यावर होते. त्यांच्यासह परिसरातील नागरिकांचा अपघातामुळे व मोठ्या आवाजामुळे थरकाप उडाला. 

लोकमतचे प्रश्न

- कोणी जखमी नसले तरी अपघात झाला असल्याची नोंद पोलिसांनी का केली नाही?- कारचालकास पोलिस ठाण्यात आणले असताना त्याने मद्यपान केले आहे किंवा नाही याबाबत वैद्यकीय तपासणी का केली नाही?- गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस तक्रारदाराची प्रतीक्षा का केली?- पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल का करून घेतला नाही?- पोलिसांवर कोणाचा दबाव होता?

टॅग्स :Accidentअपघातpimpri-acपिंपरी