By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:56 IST
1 / 5जर तुम्हाला बर्फाने आच्छादलेल्या डोंगरांगांमधून जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घ्यायचा आहे का? तर झटपट टूर प्लॅन करू शकता. या अॅडवेंचर्सचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडला भेट द्यावी लागेल. स्वित्झर्लंडमध्ये पर्यटकांसाठी अल्पाइन रिसॉर्टवर एक अनोखी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. 2 / 5या प्रोजेक्टसाठी 5.26 कोटी डॉलर खर्च करण्यात आले आहेत. बर्फाने आच्छादलेल्या डोंगररांगांमधून जाणारी ही जगातील पहिली रल्वे लाइन आहे. याला जगभरातील सर्वात जास्त उतार असलेली फ्यूनिकूलर रेल्वे (एक प्रकारची केबल रेल्वे लाइन) असल्याचे सांगितले जात आहे. 3 / 5ही रेल्वे लाइन समुद्रसपाटीपासून 4300 फूट उंचावर आहे. एखाद्या बॅरेलच्या आकाराचे डब्बे अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की, ज्यामुळे अल्पाइन पठारावर असणाऱ्या उतारावरही प्रवाशांना काहीही त्रास होणार नाही. उतारावरून खाली येताना हे डब्बे आपोआप आपली स्थिती बदलू शकतात. 4 / 5ट्रेनचा वेग 10 मीटर प्रति सेकंद आहे. ही रेल्वे लाइन एकूण 1738 मीटरच्या अंतराव तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये 743 मीटर फक्त उतारच आहे. 5 / 5रेल्वे अधिकारी इवान स्टीनर यांनी सांगितले की, ही रेल्वे लाइन आणि ट्रेन तयार करण्यासाठी एकूण 14 वर्षांचा कालावधी लागला आहे.