By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:03 IST
1 / 6दुबईत गेल्या महिन्यात चक्क उंटांसाठी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. 2 / 6अरब देशांमध्ये उंट म्हणजे मोठी वारसा संपत्ती मानली जाते. येथे उंटांची शर्यंत, सौंदर्य स्पर्धांचे आयोजन केले जाते.3 / 6आपली संपत्तीचे जतन करणे हाच या उंटांच्या रुग्णालयाचा प्रमुख उद्देश आहे. या हॉस्पीटलसाठी 1.09 कोटी डॉलरचा खर्च झाला आहे. 4 / 6या रुग्णालयात पशू चिकित्सकांची टीम 20 उंटांवर उपचार करू शकते. 5 / 6रुग्णालयात उंटासाठी मनी-रेस ट्रॅकही उपलब्ध करण्यात आला आहे. 6 / 6उंट हा अरब देशातील प्रमुख प्राणी असून त्याची काळजी घेण्यासाठीच हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे.