शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:35 IST

1 / 7
समुद्रकिनारा म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती सोनेरी वाळू आणि निळ्याशार लाटा. पण जगात काही असे किनारे आहेत, जिथे निसर्गाने आपली कल्पकता अशा प्रकारे उधळली आहे की, ते पाहून तुम्हाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एखाद्या चित्रपटातील फॅन्टसी जगासारखे वाटणारे 'हे' ६ समुद्रकिनारे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवेत.
2 / 7
मालदीवमधील वधू आयलंडवर रात्रीच्या वेळी एक वेगळाच चमत्कार पाहायला मिळतो. येथील समुद्राच्या लाटा रात्री निळ्या रंगात चमकतात. हे दृश्य पाहून असं वाटतं की आकाशातले तारे समुद्रात उतरले आहेत. वैज्ञानिक भाषेत याला 'बायोल्युमिनेसेंट प्लँक्टन' म्हणतात. वाळूवर पाऊल ठेवताच तिथे निळा प्रकाश पसरतो, जो अनुभव खरोखरच जादुई असतो.
3 / 7
तुम्ही कधी गुलाबी रंगाचा समुद्रकिनारा पाहिलाय? बहामासचा हा किनारा आपल्या मऊ गुलाबी वाळूसाठी जगभर प्रसिद्ध आहे. समुद्रातील लाल रंगाचे पोवळे आणि पांढरी वाळू यांचे मिश्रण झाल्यामुळे या किनाऱ्याला एक सुंदर पेस्टल गुलाबी छटा मिळाली आहे. निळं पाणी आणि गुलाबी किनार ही जोडी एखाद्या चित्रासारखी सुंदर दिसते.
4 / 7
आपल्या भारतातील ओडिशामध्ये एक असा समुद्रकिनारा आहे जो विज्ञानालाही थक्क करतो. चांदीपूर बीचवर भरतीच्या वेळी समुद्र जवळ असतो, पण ओहोटीच्या वेळी तो चक्क ५ किलोमीटर मागे जातो. यामुळे तुम्ही समुद्राच्या तळावर चक्क पायी चालू शकता. काही तासांनी पुन्हा पाणी आपल्या जागी परत येते, हा खेळ पाहण्यासारखा असतो.
5 / 7
एकेकाळी हा भाग कचरा टाकण्यासाठी वापरला जात असे. मात्र, निसर्गाची किमया पहा; समुद्राच्या लाटांनी काचेच्या तुकड्यांना घासून त्यांचे गुळगुळीत आणि रंगीबेरंगी खड्यांमध्ये रूपांतर केले. आज हा किनारा वाळूने नाही तर हिऱ्यांसारख्या चमकणाऱ्या रंगीत काचांच्या खड्यांनी भरलेला आहे.
6 / 7
थंडगार समुद्राच्या शेजारी गरम पाण्याचे झरे असलेल्या या किनाऱ्याची मजा काही औरच आहे. येथे जमिनीखालील भूगर्भीय उष्णतेमुळे वाळूतून गरम पाणी बाहेर येते. पर्यटक येथे वाळू खणून स्वतःचा छोटा गरम पाण्याचा हौद तयार करतात आणि समुद्राच्या लाटा पाहत गरम पाण्यात निवांत बसण्याचा आनंद घेतात.
7 / 7
ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेला लाव्हा जेव्हा समुद्राच्या थंड पाण्याला स्पर्श करतो, तेव्हा त्याचे रूपांतर बारीक काळ्या कणांमध्ये होते. यामुळेच हवाई बेटावरील हा किनारा पूर्णपणे काळ्या रंगाचा आहे. या काळ्या वाळूवर विश्रांती घेणारे समुद्री कासव पाहणे हा पर्यटकांसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
टॅग्स :tourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स