शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मार्च महिन्यात पर्यटनासाठी 'ही' आहेत शानदार ठिकाणं, मित्रांसह करू शकता ट्रिप प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:53 IST

1 / 5
मार्च महिना हा पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी योग्य असल्याचे मानले जाते. कारण या दिवसात जास्त थंडी किंवा जास्त गर्मी नसते. अशा परिस्थितीत, तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. जर तुम्ही मार्चमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. गर्दीपासून दूर या ठिकाणी तुम्हाला शांततेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसेच, या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य तुमचे मन मोहून टाकू शकेल.
2 / 5
वेलास हे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील एक सुंदर छोटेसे गाव आहे. जे समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. याठिकाणी तुम्ही जाण्याचा प्लॅन करू शकता. या गावात अनेक मच्छीमार राहतात. त्यामुळे या गावाला मासेमारीचे गाव देखील म्हणतात. हे गाव मुंबईपासून जवळपास २२० किमी अंतरावर आहे. तसेच, मार्च महिन्यात येथे वेलास कासव महोत्सव साजरा केला जातो. तसेच, या परिसरात पर्यटन करण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही केळशी बीच, हरिहरेश्वर बीच आणि व्हिक्टोरिया फोर्ट सारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
3 / 5
प्रत्येकाने कधी ना कधी गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवला असेलच. मार्च महिन्यातही तुम्ही गोव्याला भेट देऊ शकता. या महिन्यात गोव्यातील शिगमा आणि गोवा कार्निव्हलसारखे सर्वात मोठे उत्सव साजरे केले जातात. २०२५ मध्ये शिगमा महोत्सव २१ मार्च ते २९ मार्च दरम्यान साजरा केला जाईल. हा सण होळीनिमित्त आहे. रंगांची होळी, पारंपारिक लोकनृत्ये, मिरवणूक आणि पौराणिक कथांवर आधारित शिल्पे आणि चित्रे हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते.
4 / 5
मार्च महिना हा तलावांच्या शहर उदयपूरला भेट देण्यासाठी योग्य आहे. यावेळी येथील हवामान चांगले असते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही उदयपूरला जाऊ शकता. उदयपूर शहरातील तुम्ही सिटी पॅलेस, सज्जनगड पॅलेस, जग मंदिर पॅलेस, पिचोला तलाव आणि जयसमंद तलाव अशा अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.
5 / 5
उत्तराखंडच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेले नैनिताल हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुमचे मन मोहून टाकेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी नैनितालला भेट देऊ शकता. तसेच, येथे नैना देवी आणि हनुमान गढी मंदिराला भेट देऊ शकता. याशिवाय, नैनी लेक, टिफिन टॉप, स्नो व्ह्यू पॉइंट, हिमालयन व्ह्यू पॉइंट, इको केव्ह गार्डन, पांडव गुहा, भीमताल लेक, बिनायक, सातताल, लँड्स एंड पिकनिक स्पॉट, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि जीबी पंत हाय अल्टिट्यूड प्राणीसंग्रहालय यासारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स