म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'हे' आहे संत व्हॅलेंटाइनचं गाव, ज्यांच्या आठवणीत साजरा केला जातो Valentine Day
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 17:22 IST
1 / 7येत्या १४ फेब्रुवारीला जगभरातील वेगेवगळ्या देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. व्हॅलेंटाइन डे हा संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत साजरा केला जातो. त्यांनी लोकांमध्ये प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला होता. याच कारणाने रोममध्ये तिसऱ्या शतकातील राज क्लॉडियसने फाशीची शिक्षा दिली होती. आज आम्ही तुम्हाला फ्रान्समधील व्हॅलेंटाइनच्या गावात घेऊन जाणार आहोत. या गावाला 'व्हिलेज ऑफ लव्ह' म्हणजेच प्रेमाचं गाव असं नाव देण्यात आलं आहे. 2 / 7हे गाव लॉयर व्हॅलीमध्ये आहे. या गावाचं नाव आहे St. Valentine. जर तुम्हाला असं वाटत असेल की, पॅरिस हे जगातलं सर्वात रोमॅंटिक शहर आहे तर तुम्ही एकदा या गावात यायलाच हवं. 3 / 7राजा क्लॉडियसचं मत होतं की, अविवाहित पुरुष हे विवाहित पुरूषांच्या तुलनेत अधिक चांगले होऊ शकतात. त्यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन हे धर्मगुरू होते आणि त्यांनी राजाच्या या आदेशाला विरोध दर्शवला होता. त्यांना अनेक सैंनिकांचे आणि अधिकाऱ्यांची लग्ने लावून दिली होती. पण त्यानंतर राजाने त्यांना १४ फेब्रुवारीच्या दिवशीच फाशीची शिक्षा दिली. तेव्हापासूनच प्रिय लोकांना व्हॅलेंटाइन म्हणण्यास सुरूवात झाली. 4 / 7हे गाव छोटं आहे पण निसर्गारम्य आणि मनमोहक आहे. या गावात १२ ते १४ फेब्रुवारीला उत्सवासारखं वातावरण असतं. या दिवसात या गावात सगळीकडे फक्त फूलं बघायला मिळतात. अशी मान्यता आहे की, या तीन दिवसात प्रेम व्यक्त केलं तर दगडही पिघळून हो म्हणेल. 5 / 7या गावात एक लवर्स गार्डन आहे. या परिसरातील हे सर्वात रोमॅंटिक ठिकाण आहे. इथे एक छोटा तलाव असून काही सुंदर झाडेही आहेत. या झाडांखाली लव्हबर्ड्स बसलेले असतात. इथेच एक लोकल मार्केटही आहेत. 6 / 7पूर्वी गार्डमधील झाडांवर लव लॉक लावण्याची प्रथा होती. या लॉकवर कपल्प एकमेकांचं नाव लिहित असत आणि चावी पाण्यात फेकत असत. पण आता हे बंद करण्यात आलं आहे. आता लोक येथील झाडांवर लव नोट्स लिहितात. 7 / 7इथे एक झाड आहे या झाडाला 'ट्री ऑफ इटरनल हार्ट्स' म्हणजेच 'अनंत हृदयाचं झाड' असं म्हटलं जातं. कपल्स इथे येऊन झाडाची शपथ घेतात आणि पार्टनरसोबत इमानदार राहणार असं सांगतात. या झाडाजवळ अनेक कपल्स लग्नही करतात.