By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 16:19 IST
1 / 7वाढते प्रदूषण ही सर्वच देशांची समस्या आहे. मात्र यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि लोकांना निसर्गाच्या अधिक जवळ आणण्यासाठी चीनने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. 2 / 7दक्षिण चीनमधील गुइलिनमध्ये एक बबल हॉटेल उभारण्यात आले आहे. बबल हॉटेल सुंदर असून दोन डोंगरांमध्ये असलेल्या नदीजवळ तयार करण्यात आले आहे. जगभरातील अनेक पर्यटक या हॉटेलला आवर्जून भेट देत असतात. 3 / 7लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता या मुख्य उद्देशाने हे हॉटेल तयार करण्यात आले आहे. हे हॉटेल पूर्णपणे पारदर्शी असून बबलच्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. 4 / 7बबल हॉटेल दोन मजल्यांचे आहे. एखाद्या डबल डेकर विलाप्रमाणे हे हॉटेल तयार करण्यात आले आहे. तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत. 5 / 7गुइलिन हे चीनमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. या शहरातील मुख्य व्यवसाय पर्यटन आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांमध्ये आठ कोटी पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली आहे. 6 / 7गुइलिन शहरात राहणाऱ्या लोकांची 20 टक्के कमाई ही फक्त पर्यटनामुळे होते. त्यामुळेच चीनमधील ईको टूरिज्म डेस्टिनेशन म्हणून या शहराचा विकास करण्यात येत आहे.7 / 72020 पर्यंत शहराच्या कमाईतील 27 टक्के हिस्सा हा पर्यटनातून येईल असा येथील लोकांना असा विश्वास आहे. याआधी चीनव्यतिरिक्त फ्रान्समध्येही बबल हॉटेल तयार करण्यात आलं होतं.