म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 18:01 IST
1 / 7मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मांडू म्हणडेच मांडवगढ असं या पर्यटनस्थळाचे नाव आहे. या ठिकाणाला तितली पार्क असं सुद्धा म्हणतात.2 / 7या ठिकाणचे रंगेबीरंगी फुलपाखरू प्रमुख आकर्षण आहे. या ठिकाणच्या राज्य वन विभागाने सुप्रसिध्द फुलपाखरांचे पार्क ८० लाख रूपये खर्च करून तयार केले आहे. या पार्कचं नाव जमुनादेवी तितली पार्क असं आहे. 3 / 7या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं दिसण्यासोबतच १०० वेगवेगळ्या प्रकरचे फुलपाखरांच्या प्रजाती सुद्धा पाहता येणार आहेत.4 / 7या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तमोत्तम सुविधा दिल्या जाणार आहेत. हे पर्यटन स्थळ बाज बहादुर आणि रानी रूपमति यांच्या प्रेमाचे प्रतिक मानलं जातं.5 / 7या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढवण्यासाठी तसंच व्यवसाय विकसीत करण्यासाठी हे पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येणार आहे. 6 / 7फुलपाखरं ही नेहमीचं मनाला आनंद देणारी असतात. त्यामुळे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहण्यासाठी या पार्कची निर्मीती करण्यात आली. 7 / 7फुलपाखरं ही नेहमीचं मनाला आनंद देणारी असतात. त्यामुळे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहण्यासाठी या पार्कची निर्मीती करण्यात आली.