लोकप्रिय नसल्या तरी आकर्षक आहेत भारतातील 'या' हेरिटेज साइट्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 16:49 IST
1 / 6आपण जेव्हाही वर्ल्ड हेरिटेज साइट्सबाबत बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी ताजमहालाची प्रतिमा उभी राहते किंवा मग मध्यप्रदेशच्या खजुराहो मंदिराची. पण तुम्हाला माहीत आहे का? या व्यतिरिक्तही अनेक हेरिटेज साइट्स भारतामध्ये आहेत. भारतामध्ये एकूण 36 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. यांपैकी अनेक ठिकाणं अशी आहेत, ज्यांना ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यता मिळाली असूनही ती फारशी लोकप्रिय नाहीत. पण येथे फिरण्याचा अनुभव अत्यंत सुखद असून एकदा तरी या ठिकाणांना भेट देणं आवश्यक आहे. 2 / 6कर्नाटकमध्ये असणाऱ्या हम्पीमध्ये विजयनगर शासनकाळातील मंदिरांचे अवशेष अस्तित्वात आहेत. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर 7व्या शतकातील वीरूपक्ष मंदिर आहे. हम्पी भारतातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच न्यू-यॉर्क टाइम्सने 2019मधील पर्यटनासाठी सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ठिकाणांच्या यादीमध्ये हम्पीला 52व्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. 3 / 6गुजरातच्या पाटणामध्ये असलेली रानी की वाव 11व्या शतकामध्ये तयार करण्यात आलं होतं. याला पुरातत्व विभागाच्या खोदकामामध्ये सापडलं होतं. हे ठिकाण आपल्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या कलाकृतींना वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालेलं असून हे ठिकाण भारतातील सर्वात दुर्मिळ हेरिटेज साइट्सपैकी एक आहे. 4 / 6खऱ्या अर्थाने हिमालयाचं सौंदर्य अुभवायचं असेल तर एकदा तरी कंचनजंगा नॅशनल पार्कला भेट द्यावी. निसर्गप्रेमींसाठी सिक्कीममध्ये असलेलं हे नॅशनल पार्क हे निसर्गाचा अद्भूत नजराणा आहे. येथे तुम्हाला गुहा, नदी, जंगल सर्वकाही पाहायला मिळेल. 5 / 6आगऱ्याच्या किल्ल्याचाही यूनस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु याची लोकप्रियता समोरच असलेल्या ताजमहालापेक्षा फार कमी आहे. हा किल्ला 94 एकर जमिनीवर वसलेला असून याचे दोम विशेष द्वार आहेत. दिल्ली द्वार आणि लाहोर द्वार. हा किल्ला मुघलांनी 16व्या शतकामध्ये बांधला होता. 6 / 6मध्यपाषाण युगाची ओळख करून देणाऱ्या या रॉक सेंटरमध्ये त्या युगातील पेटिंग्ज पाहायला मिळतात. याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची संस्कृतीही या पेंटिग्जशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही एकदा तरी भेट देणं आवश्यक आहे.