दुबई फिरण्याची शानदार संधी! फक्त 81,000 रुपयांत हॉटेलमध्ये राहण्यासह मिळेल 'ही' सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 14:58 IST
1 / 7दुबई हे जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक दुबईत भेट देण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीने (IRCTC) एक शानदार टूर पॅकेज आणले आहे.2 / 7Dazzling Dubai Ex Delhi असे या आयआरसीटीसीच्या टूर पॅकेजचे नाव आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही दिल्ली ते दुबई प्रवास करू शकता. हे पॅकेज अतिशय किफायतशीर आहे.3 / 7या पॅकेजमध्ये दुबई व्यतिरिक्त अबुधाबीला जाण्याचीही संधी मिळणार आहे. हे एक हवाई टूर पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्ही 6 दिवस आणि 5 रात्रीच्या टूरचा आनंद घेऊ शकता.4 / 7ही टूर 23 मार्चपासून सुरू होणार असून 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्हाला दुबईतील 3-स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळेल. दुबईमध्ये तुम्हाला कॅबची सुविधा मिळेल.5 / 7याचबरोबर, या टूर पॅकेजनमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय प्रत्येकाला मिळणार आहे. तसेच, आयआरसीटीसी सर्व प्रवाशांचा प्रवास विमा काढणार आहे.6 / 7जर तुम्हालाही या पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे. ज्याची वैधता किमान 6 महिने आहे. यासोबतच प्रवासाच्या 72 तास आधी तुमचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.7 / 7या टूर पॅकेजमध्ये एका व्यक्तीला प्रवास करण्यासाठी 99,000 रुपये, दोन लोकांसाठी 81,900 रुपये प्रति व्यक्ती आणि प्रवास करणाऱ्या तीन लोकांसाठी 81,900 रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरावे लागेल.