By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:28 IST
1 / 4हिमालयाच्या कुशीत राहणारा हिमबिबट्या मुळातच लाजाळू प्राणी आहे. पर्वताच्या रांगांमध्ये आणि तेही बर्फात तब्बल ५ हजार मीटर उंचीवर तो राहतो. 2 / 4जिथे सतत बर्फ पडतो, अशा पर्वताच्या रांगांमध्ये हिमबिबट्या राहतो. पांढऱ्याशुभ्र बर्फात किंवा खडकांच्या रंगात मिसळून जावा असा या बिबट्याचा रंग असतो.3 / 4हिमबिबट्या समुद्रसपाटीपासून ३३५० ते ६७०० मीटर उंचीवर दिसतो. ७५ ते १३० सेंटीमीटर लांबी असलेल्या या बिबट्याची मादी यापेक्षा थोडीशी लहान असते.4 / 4मोठमोठाले दगड आणि त्याच वेळी ८५ सेंटीमीटर बर्फातही तो अगदी सहजपणे राहू शकतो. जगभरात या हिमबिबट्याची संख्या ४५१० ते ७३५० इतकी सांगितले जाते.