गणेशोत्सवादरम्यान भेट द्यावीच अशी भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिरे, यात महाराष्ट्रातील प्रमुख चार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:49 IST
1 / 7सिद्धिविनायक मंदिर मुंबई : हे गणपतीला समर्पित असलेल्या सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. या गणपतीला नवसाला पावणारा गणपतीदेखील म्हणतात. 1801 मध्ये बांधलेले हे भव्य अन् अनेक सेलिब्रिटींचे आवडते मंदिर आहे.2 / 7दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे : पुण्यातील या गणपती मंदिरात 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद गणपतीची मूर्ती आहे. दूरवरून लोक दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी येतात.3 / 7विघ्नहर मंदिर ओझर : पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठावर हे गणपती मंदिर आहे. मंदिराची रचना विस्तृत, सुशोभित प्रवेशद्वार, प्रशस्त अंगण आणि सर्वत्र शिल्प आणि भित्तिचित्र आहे.4 / 7गणपतीपुळे मंदिर रत्नागिरी : मुंबईपासून 350 किलोमीटर अंतरावर कोकणातील हे 400 वर्षे जुने पश्चिमाभिमुख लंबोदर मंदिर आहे. या तटीय मंदिरातील गणपतीची मूर्ती पश्चिमेकडील रक्षणासाठी स्वतः प्रकट झाली असे मानले जाते.5 / 7उची पिल्लयार मंदिर तिरुचिरापल्ली : त्रिची येथील रॉकफोर्टच्या शिखरावर असलेले हे मंदिर विजयनगरच्या राजघराण्यांनी बांधले होते. हे मंदिर येथील वास्तुकला आणि डोंगरमाथ्यावरील कावेरी नदीच्या सुंदर दृश्यासाठी प्रसिद्ध आहे.6 / 7कनिपकम विनायक मंदिर चित्तूर आंध्र प्रदेशातील : हे 1000 वर्षांहून अधिक जुने आहे, चित्तूर जिल्ह्यातील कनिपाकम गावात चोल राजा कुलोथुंगा चोल याने बांधलेले एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.7 / 7वर नमूद केलेल्या मंदिरांव्यतिरिक्त, रणथंबोर गणेश मंदिर, वरसिद्धी विनयागर मंदिर चेन्नई, कलामासेरी महागणपती मंदिर केरळ, गणेश टोक मंदिर गंगटोक, राजस्थान आणि जयपूर येथेही भारतातील काही प्रसिद्ध गणपती मंदिरे आहेत.