By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 17:20 IST
1 / 10इंडोनेशियात भारतीय चलनाची किंमत 207.78 इंडोनेशियन रुपये इतकी आहे. येथे भारतीय चलनाची किंमत जास्त आहे. भारताला येथे मोफत व्हिसा दिला जातो. कमी पैशांत जास्तीत जास्त मौज करण्यासाठी इंडोनेशिया उत्तम पर्याय आहे2 / 10व्हिएतनाममध्ये भारताच्या एका रुपयाची किंमत 355.04 वियतनामी डोंग इतकी आहे. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर व्हिएतनाम एक उत्तम पर्याय आहे. येथील संग्रहालय आणि वास्तुकला पाहण्यासारखे आहेत. 3 / 10कंबोडियात भारतीय चलनाची किंमत 63.23 कंबोडियन रियाल इतकी आहे. अंगकोर वाट मंदिरासाठी कंबोडिया प्रसिध्द आहे. विशाल दगडांचा वापर करुन हे मंदिर बांधण्यात आलं आहे. येथे अत्यंत कमी खर्चात तुम्ही फिरु शकतात. 4 / 10श्रीलंकेत भारतातील एक रुपया म्हणजे 2.38 श्रीलंकन रुपया आहे. भारतापासून अत्यंत जवळ असणा-या श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखं आहे. येथील समुद्र किनारे, डोंगरद-या, हिरवळ आणि ऐतिहासिक स्मारके मुख्य आकर्षण आहे. 5 / 10नेपाळमध्ये भारतीय एक रुपयाची किंमत 1.60 नेपाळी रुपया इतकी आहे. येथे जाण्यासाठी आपल्याला व्हिसाची गरज लागत नाही. 6 / 10हंगरीत भारतीय एक रुपया म्हणजे 3.99 हंगेरीयाई फ़ॉरिंट आहे. हंगरीची वास्तुकला आणि संस्कृती अतिक्षय लोकप्रिय आहे. हंगरीची राजधानी बुद्धापेस्ट जगातील सर्वात रोमांटिक शहरापैकी एक आहे. परदेशवारी करायची असेल तर येथे नक्की जा. येथे जाण्यासाठी खिसा जड असण्याची गरज नाही. 7 / 10जापानमध्ये भारतीय एक रुपया म्हणजे 1.70 जपानी येन आहे. शिस्त आणि मेहनतीसोबत आपल्या संस्कृतीसाठी जापान प्रसिद्द आहे. तेथील प्रगत तंत्रज्ञानाचे अविष्कार पाहण्याजोगे आहेत. 8 / 10चिली येथे भारतीय एक रुपयाची किंमत 9.64 चिली पेसो आहे. जंगल आणि ट्रेकचा आनंद घेण्यासाठी चिली अत्यंत सुंदर ठिकाण आहे. चिलीमध्ये शेती, नदी, डोंगरद-या अत्यंत आकर्षक आहेत.9 / 10 कोस्टा-रिका येथे भारतीय रुपयाची किंमत 9.03 कोस्टा रिकन कोलोन इतकी आहे. हा देश मध्य अमेरिका स्थित आहे. ज्वालामुखी, जंगले आणि वन्यजीव हे येथील प्रमुख आकर्षण आहे. 10 / 10पेराग्वे येथे भारतीय एक रुपया म्हणजे 88.48 पैरागुएआन गुआरानी इतकी आहे. पेराग्वे दक्षिण अमेरिकामध्ये स्थित आहे. पेराग्वेमध्ये नैसर्गिक आणि भौतिकवाद यांचे मिश्रण पाहण्यास मिळते.