बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर तलाव... पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही 'लडाख'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 14:24 IST
1 / 8नवी दिल्ली : निसर्गाच्या सर्व सौंदर्याचा कुठेतरी एकत्रितपणे शोध घेतला तर ते सर्व सौंदर्य लडाखमध्ये पाहायला मिळेल. लडाख हे देशातील सर्वात सुंदर आणि आरामदायी ठिकाणांपैकी एक आहे. लडाखमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. याठिकाणी बर्फाळ पर्वत असतील तर थंड तलावही आहेत. तसेच, तुम्ही मठांच्या शांततेचा आनंद घेऊ शकता आणि रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता. लडाख अनेक उत्तम ठिकाणे आहे, त्याबद्दल जाणून घेऊया...2 / 8नवी दिल्ली : निसर्गाच्या सर्व सौंदर्याचा कुठेतरी एकत्रितपणे शोध घेतला तर ते सर्व सौंदर्य लडाखमध्ये पाहायला मिळेल. लडाख हे देशातील सर्वात सुंदर आणि आरामदायी ठिकाणांपैकी एक आहे. लडाखमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. याठिकाणी बर्फाळ पर्वत असतील तर थंड तलावही आहेत. तसेच, तुम्ही मठांच्या शांततेचा आनंद घेऊ शकता आणि रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता. लडाख अनेक उत्तम ठिकाणे आहे, त्याबद्दल जाणून घेऊया...3 / 8मरखा व्हॅली हे पिकनिकसाठी एक सुंदर ठिकाण आहे. या शांततेच्या ठिकाणी टेंट लावून पिकनिक करू शकता. तुम्ही रात्री मित्रांसोबत बोनफायर सारख्या खेळ आणि संगीताचा आनंद घेऊ शकता.4 / 8त्सो मोरीरी लेक १५००० फूट उंचीवर आहे. लेकचे सुंदर दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. लेकच्या सभोवतालच्या सुंदर दऱ्यांमुळे थंडीचा अनुभव मिळतो.5 / 8रॉयल पॅलेस त्सेमो टेकडीवर आहे. दगड, माती आणि वाळूने बनलेला पॅलेस हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. रॉयल पॅलेस पाहून तुम्ही लडाखचा इतिहास शोधू शकता.6 / 8झांस्कर व्हॅलीचे सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. आजूबाजूला डोंगर, मधोमध सुंदर नदी आणि वर निळे आकाश हे दृश्य अतिशय सुंदर बनवते. येथे तुम्ही अनेक दिवस राहून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटू शकता.7 / 8चादर ट्रेकवर गोठलेल्या झांस्कर नदीचे दृश्य पाहण्यासारखे आहे. गोठलेल्या बर्फाळ नदीवर फिरण्याचा अनुभव वेगळा आहे, तो एखाद्या साहसापेक्षा कमी नाही.8 / 8उंचावर असलेले खारदुंग ला पास खिंड पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे हिमालयाच्या सुंदर बर्फाच्छादित पर्वत रांगा पाहता येतात.