By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 15:10 IST
1 / 4अंबरनाथमधील नववर्ष शोभा यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (छाया - पंकज पाटील)2 / 4 अंबरनाथमध्ये हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला सकाळी 8 वाजता स्वामी समर्थ चौकातील हेरंब मंदिरापासुन सुरुवात करण्यात आली. या यात्रेत महिलांचीच सर्वाधिक गर्दी होती. या यात्रेची सांगता हुतात्मा चौकात करण्यात आली. 3 / 4गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन अंबरनाथमध्ये करण्यात आले होते. स्वागत यात्र समितीचा पदभार हा महिला मंडळाकडे देण्यात आल्याने महिलांनी देखील स्वागत यात्रेची जय्यद तयारी केली होती. 4 / 4 यात्रेमध्ये झालेल्या गर्दीत महिलांचा उत्साह हा सर्वाचे आकर्षण ठरले होते. सर्वाधिक गर्दी ही केवळ महिलांचीच झाली होती. ढोल पथक, लेझिम पथकांसह अनेक महिला मंडळांनी सहभाग घेतला.