ठाण्यात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 23:09 IST
1 / 5ठाणे शहराच्या मध्यभागी मासुंदा तलावाजवळ शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अनेकांनी मानवंदना दिली. (सर्व छायाचित्रे- विशाल हळदे)2 / 5. गडकरी रंगायतन, सेंट जैन चर्च, कॉप्पीनेश्वर मंदिर आणि जांबळी बाजार यांसारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांजवळच्या तलावाशेजारीच हा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.3 / 5शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ठाण्यातील शिवसेनेच्या महापौर मीनाक्षी शिंदे आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केले.4 / 5यावेळी भाजपाचे नगरसेवक नारायण पवार, काँग्रेसचे सचिन शिंदे, राहुल पिंगळे, समाजसेवक नारायण थिटे, महेश सकपाळ, समीर वीरकर, दर्शन भोईर तसेच छावा वा संघटनेचे महेश ढेरे आदी सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.5 / 5शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.