1 / 9राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. 2 / 9विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे. 3 / 9अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण होती. आपण बंड केला नसून उठाव केल्याचं सांगत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच आपला जीवनप्रवासही उलगडला. 4 / 9एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आता, रिक्षाचालकांसाठी त्यांच्याकडे आमदार उदय सामंत यांनी मोठी मागणी केली आहे. 5 / 9एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सोशल मीडियामुळे सर्वत्र चर्चा झाली. अनेकांनी शिदेंच्या भाषणाचं कौतुक करत त्यांना दाद दिली. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर रिक्षावाला म्हणत टीका केली होती.6 / 9आता ठाण्यातील रिक्षाचालक एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री या आशयाचे टि शर्ट परिधान करुन रिक्षावाल्यांनी एकनाथ शिदेंचं समर्थन केलं आहे. 7 / 9ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. 8 / 9मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले टीशर्ट रिक्षाचालकांनी घातले होते. तसेच रिक्षाचे चिन्ह व रिक्षावर लालबत्ती दाखवण्यात आलेली आहे. 9 / 9दरम्यान, 'काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही जोरदार पलटवार केला आहे.