ती मॅच पाहायला आली अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका! भारतीय खेळाडूच्या पत्नीचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 15:55 IST
1 / 9भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांना शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. रॉड लेव्हर एरिना येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीला लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस या ब्राझीलच्या जोडीकडून 6-7 (2) 2-6 ने पराभव पत्करावा लागला.2 / 9ही जोडी फायनलमध्ये हरली असली तरी सोशल मीडियावर लोक त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत. तसेच या दोघांशिवाय आणखी एका चेहऱ्याने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवले आहे. ती रोहन बोपन्नाची पत्नी सुप्रिया बोपण्णा आहे. 3 / 9ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मध्ये रोहन बोपण्णाला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी सुप्रिया अन्नैया देखील मेलबर्नमध्ये उपस्थित होती. सुप्रियाचे मॅच पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 4 / 9यानंतर चाहते बोपण्णाला सुप्रियाबाबत विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. यामध्ये रोहन बोपण्णाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 5 / 9खरं तर, सोशल मीडियावर एका चाहत्याने बोपण्णाची पत्नी सुप्रियाचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'बोपण्णाची पत्नी??? मी पाहिलेली ती सर्वात सुंदर स्त्री आहे का?' 6 / 9ज्यावर टेनिस स्टारने प्रतिक्रिया दिली आणि उत्तर दिले, 'होय मी सहमत आहे.' 7 / 9रोहन बोपण्णानेही सामन्यानंतर चाहत्यांच्या प्रश्नाला होकार दिला. चाहत्याने बोपण्णाची पत्नी सुप्रिया हिला सुंदर महिला म्हटले. 8 / 9रोहन बोपण्णा आणि सुप्रिया यांचे लग्न 2012 मध्ये झाले होते आणि दोघांना एक मुलगी आहे. 9 / 9सुप्रिया एक मानसशास्त्रज्ञ आहे. रोहन आणि सुप्रिया 2010 पासून एकमेकांना डेट करत होते.