1 / 7भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे कुटुंबीय क्रिकेटचे चाहते आहेत. नुकतंच तिनं दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जर मी मुलगा असते तर मला क्रिकेटपटू बनावं लागलं असतं. 2 / 7सानिया मिर्झाचे वडील इमरान मिर्झा मुंबईत क्लब क्रिकेट खेळायचे, त्यांच्याशिवाय सानियाच्या कुटुंबात चार व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी आपापल्या देशाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व सांभाळले आहे.3 / 7सानियानं 2010मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकशी विवाह केला. 4 / 7पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं तीन कसोटी, 41 वन डे आणि 20 ट्वेंटी-20 सामन्यांत संघाचे नेतृत्व सांभाळले आहे.5 / 7सानियाची लहान बहिण अनम मिर्झाचा नुकताच विवाह झाला. भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असद याच्याशी तिनं लग्न केलं. 6 / 7सानियाचे काका गुलाम अहमद यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी 1955-1959 या कालावधीत भारतासाठी तीन कसोटी सामन्यांत कर्णधाराची जबाबदारीही पार पाडली आहे. सानियाची आजी आणि गुलाम अहमद यांची सासू या सख्या बहिणी होत्या.7 / 7पाकिस्तानचे माजी कर्णधार आसिफ इक्बाल हे सानियाचे नातेवाईक आहेत. गुलाम अहमद यांचा तो भाचा.. 1961मध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि भारताविरुद्ध सहा कसोटी सामन्यांत त्यांनी पाकिस्तान संघाचे नेतृत्व सांभाळले.