शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rafael Nadal’s luxurious lifestyle : राजेशाही थाट!; ३० कोटींचा वाडा, ४५ कोटींचे जहाज अन् ५० कोटींच्या स्वतःच्या विमानातून फिरतो राफेल नदाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:16 PM

1 / 10
स्पेनच्या राफेल नदालनं ( Rafael Nadal) रविवारी इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ०-२ अशा पिछाडीवरून नदालनं पुनरागमन करताना डॅनिएल मेदवेदेवला पराभूत केले आणि २१वं ग्रँडस्लॅम नावावर केलं. २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरला.
2 / 10
राफेलननं 2-6, 6-7 ( 5-7), 6-4, 6-4, 7-5 अशा फरकानं विजय मिळवून इतिहास घडवला. टेनिस कोर्टवरील राजाची लाईफ लक्झरीयस आहे.
3 / 10
तो ज्या वाड्यात राहतो त्याची किंमत ३० कोटी आहे. २०१३मध्ये त्यानं हा वाडा बनवला आणि तो जवळपास १५०० कोटींची संपत्ती आहे.
4 / 10
नदालनं हा वाडा Balearic बेटावर तयार केला आहे. २०२०मध्ये या वाड्याची पहिली झलक जगानं पाहिली. त्याचं हे घर १००० स्क्वेअर फिटवर उभं राहिलं आहे.
5 / 10
स्पॅनिश स्टार नदाल जगभरात भ्रमंती करतो आणि त्यासाठी त्यानं ५० कोटींचं स्वतःचं चार्टर्ड विमान Cessna Citation CJ2+ खरेदी केले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात स्पर्धा असल्यास तो या विमानानं प्रवास करतो.
6 / 10
नदालकडे 80 Sunreef Power catamaran जहाज आहे. हे जहाज म्हणजे एखादा आलीशान बंगलाच म्हणावा लागेल. एखाद्या बंगल्याल असणाऱ्या सर्व लक्झरीयस सुखसोयी या जहाजात उपलब्ध आहेत. या जहाजाची किंमत जवळपास ४५ कोटी इतकी आहे.
7 / 10
राफेल नदाल ७.३ कोटींचं घड्याळ हातात घालतो. रिचर्ड मायली ( Richard Mille) कंपनीचे हे घड्याळ आहे. त्याची किंमत 10, 00, 500 डॉलर इतकी असून अशी केवळ 50 घड्याळं आहेत..फोर्ब्सनं जाहीर केलेल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंमध्ये नदालनं 27वे स्थान पटकावले आहे. Nike, Swiss brand Richard Mille आदी अनेक कंपन्यांचा तो सदिच्छादूत आहे.
8 / 10
नदालनं २०१९मध्ये प्रेयसी मारिया फ्रेंसिस्का पेरेलोसोबत विवाह केला. नदाल आणि मारिया 2005 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
9 / 10
जवळपास 14वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी २०१८मध्ये साखरपुडा केला होता. मालोरका येथे दोघांचे लग्न झाले. बिजनेस डिग्री घेतलेली मारिया इनव्हेसमेंट बँकर आहे आणि नदालच्या फाऊंडेशनमध्ये ती प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करते.
10 / 10
जवळपास 14वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी २०१८मध्ये साखरपुडा केला होता. मालोरका येथे दोघांचे लग्न झाले. बिजनेस डिग्री घेतलेली मारिया इनव्हेसमेंट बँकर आहे आणि नदालच्या फाऊंडेशनमध्ये ती प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करते.
टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिस