शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सानिया मिर्झाच्या ‘बेबी शॉवर’चे खास फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 15:20 IST

1 / 6
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. सानियाने तिच्या 'बेबी शॉवर' चे काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 6
सानियाच्या 'बेबी शॉवर' सोबतच पायजामा पार्टीचे ही आयोजन करण्यात आले होते. सानियाची बहिण अनम मिर्झाची पायजामा पार्टीची संकल्पना होती.
3 / 6
सानिया आणि अनम या दोघींनी पार्टीमध्ये भरपूर धमाल करत वेगवेगळ्या पोझमध्ये खूप फोटो काढले. 'बेबी शॉवर' दरम्यानचा अनम सोबतचा नाचतानाचा एक व्हिडीओही सानियाने शेअर केला आहे.
4 / 6
सानिया 'बेबी शॉवर' च्या लूकमध्ये खूपच गोड दिसत होती. मात्र तिच्या या पार्टीत तिचा पती शोएब मलिक सहभागी झाला नव्हता. कामानिमित्त तो बाहेर असल्याने याक्षणी त्याला मिस करत असल्याचं सानियाने म्हटलं आहे.
5 / 6
सानियाच्या 'बेबी शॉवर'साठी एक स्पेशल स्टार केक तयार करण्यात आला होता. छोट्या छोट्या स्टार्सनी केक सुंदररित्या सजवण्यात आला होता. केक कापतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
6 / 6
ऑक्टोबरमध्ये सानिया आणि शोएबच्या घरी पाळणा हलणार आहे. याआधी सानिया मिर्झा आणि शोएब मलिकनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. सानियाच्या 'बेबी शॉवर' आणि पायजामा पार्टीसाठी तिच्या नातेवाईकांसोबत काही मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते.
टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिस