1 / 6सेंट्रल पार्कमधून सुरू झालेल्या प्रेमकथेचं एका सुंदर नात्यात रुपांतर होत आहे. माजी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन चॅम्पियन गार्बीन मुगुरुझाने प्रियकर आर्थर बोर्जेस याच्यासोबत लग्न केलं. 2 / 6आर्थरची २०२१च्या यूएस ओपनच्या वेळी न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये २९ वर्षीय गार्बीनशी भेट झाली होती आणि दोन वर्षांच्या भेटीनंतर लग्नबंधनात अडकत आहेत.3 / 6'माझे हॉटेल सेंट्रल पार्कच्या जवळ होते आणि मला कंटाळा आला होता, म्हणून मला वाटले की मी फिरायला जावे,' टेनिस स्टारने मीडियाला सांगितले. ती पुढे म्हणाली, मी बाहेर आले अन् एक तरुण माझ्या बाजूने पळत गेला. क्षणात तो वळला अन् त्याने मला अमेरिकन ओपनसाठी शुभेच्छा दिल्या. मी स्तब्ध झाले, तो खूपच हँडसम होता. 4 / 6द सनच्या वृत्तानुसार, दोघे एकमेकांना भेटत राहिले आणि नियमितपणे सेंट्रल पार्कमधून फिरत राहिले. माजी जागतिक नंबर वन मुगुरुझाने उघड केले की स्पेनमध्ये त्याने मला प्रपोज केले. 5 / 6मुगुरुझाने तिच्या आणि बोर्जेसच्या नात्याचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती म्हणाली, “पुढच्या वर्षी, उन्हाळ्यात, समुद्रकिनार्याजवळ आणि स्पेनमध्ये लग्न व्हावे अशी आमची इच्छा आहे, कारण हीच जागा आहे जी आम्हाला सर्वात जास्त सोबत ठेवते. 6 / 6मुगुरुझाने तिच्या आणि बोर्जेसच्या नात्याचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती म्हणाली, “पुढच्या वर्षी, उन्हाळ्यात, समुद्रकिनार्याजवळ आणि स्पेनमध्ये लग्न व्हावे अशी आमची इच्छा आहे, कारण हीच जागा आहे जी आम्हाला सर्वात जास्त सोबत ठेवते.