पाठक बाईंसोबत वीणाची भटकंती; पाहा अभिनेत्रींचा सफरनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 04:30 PM2021-09-28T16:30:50+5:302021-09-28T16:36:23+5:30

akshaya and veena leh ladakh trip: मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या वीणाने अलिकडेच तिच्या लेड लडाखच्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप आणि अक्षया देवधर.

उत्तम अभिनयाच्या जोरावर या दोन्ही अभिनेत्रींनी छोटा पडदा गाजवला असून सध्या त्या अनेकांचं क्रश असल्याचं पाहायला मिळतं.

वीणा आणि अक्षया एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असून सध्या त्या लेह लडाखमध्ये भटकंती करतांना दिसत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या वीणाने अलिकडेच तिच्या लेड लडाखच्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये वीणा आणि अक्षयासोबत त्यांच्या अन्य दोन मैत्रिणीदेखील असल्याचं पाहायला मिळतं.

हर मंजिल की एक पहचान होती है, और हर सफर की एक कहानी.. असं कॅप्शन वीणाने तिच्या फोटोला दिलं आहे.

ट्रिपला जाण्यापूर्वी विणाने विमानतळावर फोटो काढत तिच्या ट्रीपची माहिती चाहत्यांना दिली होती.