एक हजारों में मेरी बहना है ! 'आई कुठे काय करते'मधील यशची बहीण देखील आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:00 AM2022-06-24T06:00:00+5:302022-06-24T06:00:02+5:30

आई कुठे काय करते मालिकेत यशचं ईशाशी जितकं घट्ट नातं आहे. तेवढंच स्पेशल बॉन्डिंग तो त्याच खऱ्या आयुष्यातील बहिणीसोबत शेअर करतो.त्याची बहीण देखील अभिनेत्री आहे.

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. (Photo Instagram)

पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात हे अभिनेता-अभिनेत्री एकमेकांचे सख्खे भाऊ बहिणी आहेत ते फारसं कुणाला ठाऊक नाहीत. (Photo Instagram)

यापैकीच एक जोडी आहे. आई कुठे काय करतो (Aai kuthe kay karte) मधील यश आणि त्याच्या बहिणीची. यश म्हणजेच अभिषेक देशमुख प्रमाणेच त्याची बहीण सुद्धा अभिनय करते. (Photo Instagram)

आई कुठे काय करते मालिकेत यशचं ईशाशी जितकं घट्ट नातं आहे. तेवढंच स्पेशल बॉन्डिंग तो आपल्या खऱ्या आयुष्यातील बहिणीसोबत शेअर करतो. चला तर जाणून घेऊया यशची बहिण नक्की कोण आहे.(Photo Instagram)

अभिषेक देशमुखच्या बहीणचं नाव अभिनेत्री अमृता देशमुख आहे. छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली.(Photo Instagram)

'तुमचं आमचं सेम असतं'या मालिकेत अमृता दिसली होती.अमृताने स्वीटी सातारकर सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. (Photo Instagram)

अमृता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफोइलवर नजर टाकली तर लक्षात येतं की ती खूपच ग्लॅमरस आहे. (Photo Instagram)

अमृता आणि अभिषेक एकमेकांसोबतचे फोटो नेहमी पोस्ट करत असतात. फोटोंमध्ये बहीण-भावामधले बॉन्डिग दिसून येतं.(Photo Instagram)

अभिनेता अभिषेक देशमुखने या मालिकेआधी पसंत आहे मुलगी या मालिकेत काम केले होते. यात त्याने साकारलेली पुनर्वसूची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. (Photo Instagram)