शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 13:44 IST

1 / 9
आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. आताचे स्मार्टफोन एवढे मोठाले आहेत की ते शर्टाच्या खिशात मावताना मुश्कील आहेत. स्कूटर चालविताना पँटच्या खिशातूनही ते बाहेर डोकावत असतात. अनेकदा हे फोन चालताना, बाहेर काढताना, ठेवताना हातातून पडतात आणि स्क्रीन फुटून चांगला ५-१५ हजाराचा चुना लागतो.
2 / 9
कमी किंमतीचा फोन असेल तर ५ हजार कुठेच गेले नाहीत म्हणून समजा. लोक यापासून वाचण्यासाठी फोनला कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर लावतात. परंतु या गोष्टी समाधानासाठी असतात. कारण जर चांगला स्क्रीन गार्ड लावला नाही तर तो फुटेलच परंतु आतील स्क्रीनही फुटली तर... कंपन्यांचे हेच तर उत्पन्न असते.
3 / 9
म्हणून रस्त्यावर ३० रुपयांना, ५० रुपयांना स्क्रीन गार्ड लावण्याचे स्टॉल असतात तिथून कधीच स्क्रीन गार्ड घेऊ नका. कारण ते फक्त कचकड्याचे असतात. यामुळे कोणते स्क्रीन प्रोटेक्टर वापरावेत, चला पाहुया...
4 / 9
तुम्ही नवा फोन घेतला की कंपनी त्यावर आधीच एक प्लॅस्टिक स्क्रीन लावते. ती थर्मोप्लास्टिक पॉलियूरेथीन पासून बनलेली असते. ती फक्त स्क्रॅच पासून स्क्रीनचे संरक्षण करते. अनेकजण ती खराब होईपर्यंत काढत नाहीत. ती स्क्रीन प्रोटेक्टर किंवा स्क्रीन गार्डचे काम करत नाही.
5 / 9
साधारणपणे चार प्रकारचे स्क्रीन प्रोटेक्टर बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या फोनच्या टाईप्रमाणे, खिशाला परवडेल असा स्क्रीन प्रोटेक्टर तुम्ही वापरू शकता.
6 / 9
जर तुमच्याकडे कर्व्हड स्क्रीनचा स्मार्टफोन असेल तर हा स्क्रीन प्रोटेक्टर वापरावा. UV स्क्रीन प्रोटेक्टर देखील या कर्व्हड स्क्रीनसाठी वापरले जातात. काही लोकप्रिय ब्रँड UV स्क्रीन संरक्षक वापरण्यास विरोध करतात.यामुळे स्क्रीन कायमची खराब होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
7 / 9
जर तुमच्याकडे फ्लॅट स्क्रीन असलेला फोन असेल तर तुम्ही टेम्पर्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्टर वापरू शकता. हे स्क्रीन प्रोटेक्टर फोनवर ओरखडे आणि फुटण्यापासून संरक्षण करतात. टेम्पर्ड ग्लास ग्लॉसी आणि मॅट फिनिशमध्ये देखील येतो.
8 / 9
काही टेम्पर्ड ग्लासेसमध्ये प्रायव्हसी राखण्यासाठीची वैशिष्ट्ये देखील येतात. या प्रोटेक्टरचे वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही मोबाईल पाहत असताना तुमच्या शेजारच्याने बाजूने पाहिल्यास स्क्रीनवरील मजकूर दिसत नाही. या प्रकारच्या स्क्रीन प्रोटेक्टरमुळे स्क्रीनची चमक आणि रंग कमी दिसू लागतात.
9 / 9
सफायर प्रकारचे स्क्रीन गार्ड हे सर्वात मजबूत असतात. यामुळे तुमच्या फोनला जास्तीचे संरक्षण मिळते. या स्क्रीन खूप महाग असतात. यामुळे अनुभवी दुकानदाराकडूनच ते बसवून घ्यावे नाहीतर पैसे वाया जातात.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल