शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईल डेटा डंप म्हणजे काय? सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची माहिती या पद्धतीने उघड केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:48 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल मध्यरात्री हल्ला झाला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांना आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत, या प्रकरणाचा तपास करण्यासाटी पोलिसांनी डेटा डंपचा वापर केला आहे.
2 / 8
आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मोबाईल डेटा डंप तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत, या तपासणीवेळी डेटा डंप म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
3 / 8
डेटा डंपला सेलफोन डंप किंवा मोबाईल फोन डंप असेही म्हणतात. याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा डेटा काढता येतो. या डेटामध्ये कॉल लॉग, टेक्स्ट मेसेज, ईमेल, फोटो, व्हिडीओ, अॅप्लिकेशन डेटा, ब्राउझिंग इतिहास आणि बरेच काही समाविष्ट आहे. पोलिसांना आरोपीची चौकशी किंवा तपास करायचा असतो तेव्हा या पद्धतीचा अवलंब केला जातो.
4 / 8
यामध्ये, पोलीस आधी नेटवर्क बाबत शोध घेतात, ती व्यक्ती कोणत्या नेटवर्क क्षेत्रात होती. याची तपासणी करतात. फोनमधील लोकेशन फीचरद्वारे हे शक्य आहे.
5 / 8
यामध्ये सेल टॉवर्सची भूमिका देखील महत्त्वाची आहे. आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे जे काही अॅक्सेस करतो, तो सर्व डेटा सेल टॉवर्सकडेच राहतो. जरी यामध्ये वापरकर्त्याने तो डेटा डिलीट केला तरीही तो त्यांच्याकडे राहत असतो.
6 / 8
फोन डंप डेटा काढण्यासाठी DEMS म्हणजेच 'डिजिटल एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टम' देखील वापरली जाते. डीईएमएस ही अशी जागा आहे जी डिजिटल पुराव्यांचे व्यवस्थापन करते.
7 / 8
डेटा कोणीही काढू शकत नाही. यासाठी तपास यंत्रणांना आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच, टेलिकॉम कंपन्यांकडेही भरपूर डेटा उपलब्ध असतो.
8 / 8
१६ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता सैफ अली खानवर हल्ला झाला. मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी एका हल्लेखोराने चाकूने हल्ला केला, यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर सहा वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर खोल जखमा आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या पाठीच्या मणक्यातून २.५ इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला.
टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल