शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:31 IST

1 / 6
जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच एकापेक्षा एक भारी स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत.
2 / 6
नोव्हेंबर महिन्यात वनप्लस, लावा, आयक्यूओओ आणि रियलमी सारख्या कंपनीचे नवे स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतात, ज्यात भलामोठा डिस्प्ले आणि दमदार बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
3 / 6
लावा अग्नि ४: देशांतर्गत स्मार्टफोन ब्रँड 'लावा' आपला सर्वात प्रीमियम फोन 'अग्नि ४' लवकरच लॉन्च करणार आहे. शक्तिशाली मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० प्रोसेसर आणि ७००० mAh क्षमतेची प्रचंड बॅटरी यात मिळण्याची शक्यता आहे, तसेच यात ५० MP चा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल. या फोनची किंमत ₹ २५,००० पेक्षा कमी असू शकते.
4 / 6
रियलमी जीटी ८ प्रो: रियलमीचा फ्लॅगशिप हँडसेट नोव्हेंबरमध्ये दाखल होणार आहे. यात AMOLED डिस्प्ले, उच्च कार्यक्षमतेचा स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर आणि ७००० mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. या फ्लॅगशिप फोनची किंमत ₹ ६०,००० पेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.
5 / 6
iQOO १५: विवोचा सब-ब्रँड iQOO देखील नोव्हेंबरमध्ये 'iQOO १५' हा शक्तिशाली स्मार्टफोन घेऊन येत आहे. यात फ्लॅगशिप प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले आणि उत्कृष्ट कॅमेरा मिळू शकतो.
6 / 6
वॉबल स्मार्टफोन: देशांतर्गत कंपनी 'इंडकल' देखील आपला पहिला 'वॉबल स्मार्टफोन' लाँच करून या स्पर्धेत उतरत आहे. कॅमेरा आणि प्रोसेसरवर या ब्रँडने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनlavaलावाrealmeरियलमीtechnologyतंत्रज्ञान