1 / 7फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यात तरुणाई आघाडीवर आहे. त्यामुळेच उत्तम फोटो येणारा स्मार्टफोन घेण्याकडे अनेकांचा कल हा अधिक असतो. 2 / 7कॅमेऱ्याने चांगले फोटो येतात मात्र तो महाग असल्याने अनेक जण फोटो काढण्यासाठी फोनचाच वापर करतात. असे अनेक अॅप आहेत ज्याच्या मदतीने युजर्स त्यांचा फोटो एडिट करून अधिक सुंदर करू शकतात. अशाच काही अॅपबाबत जाणून घेऊया. 3 / 7फोटो एडिटींगसाठी PicsArtPhotoStudio हे उत्तम अॅप्लिकेशन मानले जाते. या अॅपमध्ये अनलिमिटेड फोटो एडीट करता येतात. इफेक्ट, कलर, कॉलआऊट, टेक्स्ट स्टाईल यासारखे पर्याय हे फोटो एडिट करण्यासाठी मिळतात. 4 / 7गुगलच्या Snapseed हे चांगले फोटो एडिटींग टूल असून याच्या माध्यमातून आपण कोणताही फोटो हाय क्लालिटीमध्ये एडिट करू शकतो. मात्र यामध्ये लोगो, बॅनर तयार करणं कठिण असतं. 5 / 7Toolwiz Photos-Pro Editor मध्ये फोटो एडिट करण्यासाठी काही प्रोफेशनल टूल मिळतात. काही पेड फीचर यामध्ये मोफत देण्यात आले आहेत. तसेच Fonts ही इतर अॅपच्या तुलनेत अधिक मिळतात. 6 / 7Adobe Photoshop Express हे एक अॅप असून हाय क्वालिटी फोटो तयार करण्यासाठी अनेक फंक्शन देण्यात आले आहेत. Advance फोटो एडिट करण्यासाठी या अॅपची मदत होते. अनेक जण याच्या मदतीने फोटो एडिट करतात. 7 / 7PixelLab हे एक उत्तम अॅप असून या अॅपच्या मदतीने Png Logo, Banner या सारख्या गोष्टी सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार करता येतात. तसेच काही फीचर यामध्ये मोफत देण्यात आली असून टेक्स्ट एडिटींगसाठी ते सर्वात बेस्ट मानलं जातं.