शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google वर पाकिस्तानात या वर्षात 'हे' सर्वात जास्त केलं गेलं सर्च; वाचून तुम्हालाही हसू येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:38 IST

1 / 11
Google प्रत्येक वर्षी सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध करत असते. गुगलने नुकतेच पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आलेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध केली आहे.
2 / 11
How to check polling station : पाकिस्तानमधील निवडणुकीदरम्यान हा प्रश्न सर्वाधिक सर्च करण्यात आला. पाकिस्तानमध्येही निवडणुकीवरुन लोक जागरुक आहेत. लोकांनी मतदान केंद्राची माहिती गुगलवरुन घेतली आहे.
3 / 11
How to make millions before grandma dies : या प्रश्नाची इंटरनेटवर बरीच चर्चा झाली. हा प्रश्न केवळ मनोरंजकच नाही तर तो शोधणाऱ्या लोकांचा हेतू काय होता याचा विचार करायला भाग पाडतो.
4 / 11
How to buy a used car : अनेकांना जुनी कार खरेदी करायची असते. वापरलेल्या कार खरेदीची क्रेझ पाकिस्तानमध्ये यावर्षी वाढली आहे. हा प्रश्न सर्च करुन लोक स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या गाड्या खरेदी करण्याबाबत माहिती गोळा करत होते.
5 / 11
How to make flowers last longer : फुलांना दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी नवीन पद्धत जाणून घेण्यासाठी अनेकांनी सर्च केले आहे. यावरून पाकिस्तानमधील लोक सजावट आणि नैसर्गिक सौंदर्याबाबत जागरूक होत असल्याचे दिसून येते.
6 / 11
How to download YouTube videos in PC : सध्या व्हिडीओ कंटेन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऑनलाइन व्हिडीओ डाउनलोड करणे ही आजकाल एक सामान्य गरज बनली आहे.
7 / 11
How to earn without investment : पाकिस्तानमध्ये गुंतवणुकीशिवाय पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सर्च केले आहेत.
8 / 11
How to teach my four year old to share : मुलांसोबत काही गोष्टी शेअर करणे एक मोठं चॅलेंज असते. यामुळे अनेकांनी या गोष्टी सर्च केल्या आहेत.
9 / 11
How to get a grass stain out of jeans : पॅन्टवरती लागलेले डाग काढण्यासाठी काय करावे, असे प्रश्नही लोकांनी सर्च केले आहेत.
10 / 11
How to start working out again after knee injury : गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर व्यायाम कसा सुरू करायचा हा प्रश्न आरोग्याविषयीची वाढती जागरूकता दर्शवतो.
11 / 11
How to watch world cup live : अनेकांना क्रिकेटचे सामने आणि फुटबॉलचे सामने लाईव्ह पाहायचे असतात. यासाठी गुगलवरती सर्च केले जातात.