By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 18:21 IST
1 / 6सध्याच्या इंटरनेटच्या मायाजाळात तरुण पिढी पुरती अडकली असून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच इंटरनेट डाऊन झाले तर अनेकजण सैरभैर होतात. त्यामुळे सोशल मीडियात चॅट करणे किंवा एकमेकांशी संवाद साधता येत नाही. मात्र, यातच आता काही कंपन्यांनी इंटरनेटशिवाय चॅट करता येईल अशा काही अॅप्सची निर्मिती केली आहे. ती खालीलप्रमाणे...2 / 6Fire Chat : या अॅपचा वापर इंटरनेटशिवाय होऊ शकतो. हे अॅप फोनच्या Bluetooth आणि WiFi च्या मदतीने दुसऱ्या फोनला कनेक्ट करता येते. नेटवर्क नसेल तर या अॅपच्या मदतीने फोन कॉल सुद्धा होऊ शकतात.3 / 6Birdgefy : नेटवर्क नसताना जर तुम्ही ग्रुप चॅट करणार असाल तर Birdgefy हे अॅप आपली मदत करेल. या अॅपच्या माध्यमातून तीन जण एकाचवेळी इंटरनेटशिवाय चॅट करू शकतात. हे अॅप फोनच्या WiFi च्या आधारे चालते. 4 / 6Signal Offline : WiFi च्या आधारे चालणारे Signal Offline अॅप ग्रुप चॅटिंगसाठी मदत करते. यामध्ये सिंगल पर्सन सुद्धा चॅक करु शकतात. हे अॅप Signal Foundation तयार केले नाही. 5 / 6Briar : इतर अॅप सारखे Bluetooh आणि WiFi च्या मदतीने Briar अॅपचा वापर होतो. विशेष म्हणजे, इंटरनेट परत आल्यानंतर हे Tor Network पासून सिंक होते. त्यामुळे युजर्सचा डेटा सुरक्षित राहतो. 6 / 6Vojer : फोन बुकची परवानगी घ्यायच्या आधी WiFi, Blutooth, Microphone आणि Camera च्या मदतीने Vojer अॅप काम करते. या अॅपच्या माध्यमातून इंटरनेटशिवाय व्हिडीओ कॉल करता येऊ शकते.