२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 22:04 IST
1 / 5वनप्लस नॉर्ड सीई ४: या फोनमध्ये ६.७ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ७ जनरल ३ प्रोसेसर आहे. मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५५००mAh बॅटरी आहे. हा फोन १९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.2 / 5सॅमसंग गॅलेक्सी एम ३६ 5G: या सॅमसंग फोनमध्ये ६.७ इंचाचा सॅमोलेड डिस्प्ले आणि ५००० एमएएच बॅटरी आहे. यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. अँड्रॉइड १५ आधारित वन यूआय ७.० वर चालणारा हा फोन १८ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.3 / 5इन्फिनिक्स नोट ४० प्रो 5G: या फोनमध्ये ६.७८ इंचाचा वक्र AMOLED डिस्प्ले आणि डायमेन्सिटी ७०२० प्रोसेसर आहे. या फोनमध्ये २ मेगापिक्सेल मॅक्रो आणि २ मेगापिक्सेल डेप्थ लेन्ससह १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा फोन १८ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.4 / 5वनप्लस नॉर्ड सीई ४ लाइट 5G: या फोनमध्ये ६.६७ इंचाचा १२०Hz AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ६९५ ५G चिपसेट आहे. यात ५० मेगापिक्सेल +२ मेगापिक्सेलचा रिअर आणि १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.5 / 5विवो व्ही १० 5G: विवोशी संलग्न ब्रँडच्या फोनमध्ये ६.७२-इंचाचा FHD+ डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रोसेसर आहे. या फोनमध्ये ६५००mAh ची बॅटरी देण्यात आली, जी ४४ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ५० मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आली त्याची किंमत १३ हजार ४९८ रुपयांपासून सुरू होते.