शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सेल्फी प्रेमींसाठी 'हे' पॉप अप कॅमेरा असलेले फोन ठरतील खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:12 IST

1 / 7
स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून चांगला कॅमेरा असलेला फोन घेण्याकडे अनेकांचा कल असतो. हल्ली बरेच जण फक्त कॅमेरा चांगला आहे म्हणून फोन खरेदी करतात. सेल्फी प्रेमींसाठी काही पॉप अप कॅमेरा असलेले फोन देखील उपलब्ध आहेत.
2 / 7
पॉप अप सेल्फी कॅमेऱ्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. भारतात Oppo आणि Vivo सारख्या स्मार्टफोन ब्रँड्सनी पॉप अप सेल्फी कॅमेराचा ट्रेंड सुरू केला. जगभरात अनेकजण हा ट्रेंड आता फॉलो करत आहेत. अशाच काही फोनविषयी जाणून घेऊया.
3 / 7
वनप्लस 7 प्रो हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच केला गेला. या स्मार्टफोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ही जवळपास 48,999 रुपये आहे.
4 / 7
विवो वी 15 हा स्मार्टफोन मार्चमध्ये भारतात लाँच करण्यात आला असून 21,990 रुपये या फोनची किंमत आहे.
5 / 7
ओप्पो एफ11 प्रो या स्मार्टफोनची किंमत भारतात 22,990 रुपये आहे. यावर्षीच हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.
6 / 7
विवो वी 15 प्रो या स्मार्टफोन यावर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आला आहे. पॉप अप सेल्फी कॅमेरा असलल्या या फोनची किंमत 26,990 रुपये आहे.
7 / 7
विवो नेक्स हा फोन गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतात लाँच झाला असून या फोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
टॅग्स :Vivoविवोoppoओप्पोtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल