शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:31 IST

1 / 7
व्हॉट्सअ‍ॅपवर RTO चलान भरण्याचा मेसेज आलाय? सावधान! हे खरं चलन नाही, तर हॅकर्सनी रचलेला सायबर सापळा आहे. एक क्लिक तुमच्या बँक खात्याला मोठा धोका निर्माण करू शकते.
2 / 7
'RTO Traffic Challan.apk' फाईल तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करते. हा व्हायरस रिमोट ॲक्सेसने तुमचा प्रत्येक व्यवहार पाहू शकतो. बँक तपशील, पासवर्ड आणि ओटीपी चोरीला जाण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
3 / 7
एखाद्या अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज खरा मानण्याची चूक करू नका. हॅकर्स तुमच्या एसएमएस, कॅमेरा आणि मायक्रोफोनचा एक्सेस मिळवतात. तुमचे डिजिटल जग गुप्तपणे ट्रॅक करून योग्य वेळ साधून पैसे चोरतात.
4 / 7
अशा एका चुकीच्या क्लिकने तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. अलीकडच्या काळात अशा अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. सावधगिरी बाळगा, अन्यथा अशा छोट्या चुकीसाठी मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागू शकते.
5 / 7
जर तुम्हाला खरेच एखादे चलन तपासायचे असेल, तर फक्त सरकारी वेबसाइट वापरा. Parivahan.gov.in किंवा राज्याच्या अधिकृत RTO साइटवर जा. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजवर विश्वास ठेवणे आता सुरक्षित राहिलेले नाही.
6 / 7
अनोळखी APK फाईल्स इन्स्टॉल होण्यापासून लगेच थांबवा. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Unknown Sources पर्याय बंद करा. तुमच्या परवानगीशिवाय ॲप्स इन्स्टॉल होण्यावर नियंत्रण ठेवा.
7 / 7
कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. स्कॅमर लोकांना फसवण्यासाठी रोज नवीन पद्धती वापरत आहेत. सावधगिरी बाळगा, कारण तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमचीच आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनfraudधोकेबाजी