तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट
By सिद्धेश जाधव | Updated: January 19, 2022 17:56 IST
1 / 6फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 15 हजार रुपयांच्या आत उपलब्ध असलेल्या स्मार्ट टीव्हीची यादी आपण पाहणार आहोत. जर तुम्ही 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही शोधत आहात का? तुमचं बजेट कमी आहे का? तर तुम्ही यातील स्मार्ट टीव्हीची निवड करू शकता. 2 / 6KODAK 7X Pro ची किंमत 1,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 12,499 रुपयांमध्ये मिळेल. हा अँड्रॉइड टीव्ही गुगल असिस्टंट आणि इन-बिल्ट क्रोमकास्टसह येतो. 32 इंचाच्या या टीव्हीमध्ये 24W चा साउंड आउटपुट मिळतो. या टीव्हीमध्ये Prime Video, Disney + Hotstar, Youtube असे अनेक अॅप्स मिळतात. 3 / 6Thomson 9A टीव्ही सीरिजमधील 32-इंचाचा मॉडेल Flipkart वरून 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या टीव्हीवर 1,250 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ICICI Bank कार्ड्सवर मिळेल. हा अँड्रॉइड टीव्ही 24W साउंड आउटपुट आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. 4 / 6Infinix X1 च्या 32-इंचाच्या मॉडेलची किंमत 13,499 रुपये आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड धारकांना यावर 1,250 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात Prime Video, Disney + Hotstar, Youtube अॅप्सला सपोर्ट मिळतो. हा एक अँड्रॉइड टीव्ही आहे त्यामुळे यात जो Google Assistant आणि Chromecast in-built मिळतो. 5 / 6iFFALCON F52 चा 32-इंचाचा मॉडेल सेलमध्ये 2,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. याची किंमत 13,999 रुपये आहे. यात 16W चा साउंड आउटपुट मिळतो. अँड्रॉइड टीव्ही असल्यामुळे Google Assistant आणि Chromecast in-built सह येतो. यात Prime Video, Disney + Hotstar, Youtube अॅप्स मिळतात. 6 / 6Realme Neo चा 32 इंचाचा मॉडेल 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्मार्ट टीव्हीवर 2000 रुपयांचा डिस्काउंट क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंट करून मिळवता येईल. हा स्मार्ट टीव्ही Linux ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. सोबत 20W चा साउंड आउटपुट आणि 60Hz का रिफ्रेश रेट मिळतो. हा रियलमी टीव्ही Youtube अॅपला सपोर्ट करतो.