Samsung Galaxy M53 5G : जबरदस्त ऑफर! फक्त ४ हजारात मिळणार सॅमसंगचा 5G फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:55 IST
1 / 7Samsung Galaxy M53 5G : देशात गेल्या काही महिन्यांपासून 5G सेवा सुरू केली आहे. यामुळे आता बाजारात 5G चालणाऱ्या मोबाईलची मागणी जोरदार वाढली आहे. तुम्हीही 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सॅमसंगचा M53 हा मोबाईल फक्त ४ हजार रुपयांत मिळणार आहे. 2 / 7तुम्ही फक्त ३,९४९ रुपयांत एक नवा फोन खरेदी करु शकता. यासाठी काही अटी देखील आहेत. 3 / 7तुम्ही Samsung Galaxy M53 5G के 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजवाला व्हेरियंट या किंमतीवर खरेदी करू शकता. 4 / 7Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनची किंमत ३२,९९९ रुपये असली तरी Amazon वर ३३% च्या डिस्काउंटनंतर हा फोन २१,९९९ रुपयांना सेलसाठी लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल फोनवर १८,०५० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट दिली जात आहे. तुम्ही एक्स्चेंज सवलतीचा पुरेपूर फायदा घेतल्यास, तुम्ही फक्त रु.४,००० मध्ये फोन खरेदी करु शकता. हा 5G फोन आहे आणि 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.5 / 7तुम्हाला 120hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे आणि ती Android 12 वर काम करते. 6 / 7मोबाईल फोनच्या मागील बाजूस ४ कॅमेरे आहेत, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सेल, दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेल आणि दोन कॅमेरे २ मेगापिक्सल आहेत. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये ३२-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. 7 / 7Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या येलो कलरच्या व्हेरियंटची विक्री सुरू करणार आहे. सध्या, तुम्ही Flipkart आणि Amazon द्वारे फोनची प्री-ऑर्डर करू शकता.