Redmi Note 12 5G: २२ हजाराचा मोबाईल १ हजारात खरेदी करण्याची संधी; वाचा नेमकी ऑफर काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 18:14 IST
1 / 8तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Redmi Note 12 5G या मोबाईलला Amazon वर सर्वोत्तम डिस्काउंटमध्ये मिळत आहेत. 2 / 8Amazon वर मोठी ऑफर सुरू आहे. यावर तुम्हाला Redmi चा 5G फोन फक्त १,००० रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Amazon वरून Redmi Note 12 5G खरेदी करताना ही उत्तम ऑफर उपलब्ध आहे. 3 / 8Redmi Note 12 हा 5G फोन आहे, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायासह उपलब्ध आहे.4 / 8Amazon वर या फोनची किंमत २१,९९९ रुपये आहे, पण या फोनवर ९% ची सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर या फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे.5 / 8तुम्ही जर हा मोबाईल थेट खरेदी केला तर त्याची किंमत १९ हजार ९९९ रुपये असू शकते, आणि Amzon वरुन खरेदी केला तर १ हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. 6 / 8यासाठी तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास १,००० रुपयांची सूट दिली जात आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हा फोन फक्त १,००० रुपयांमध्ये खरेदी करायचा असेल, तर काही ट्रिक आहेत.7 / 8Amazon च्या एक्सचेंज ऑफरसह, तुम्ही Redmi Note 12 5G अगदी स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. अॅमेझॉनवर १८,९९९ रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल.8 / 8पण , यात एक्सचेंज ऑफरचा फायदा स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. जर तुम्ही या ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊ शकत असाल तर फोनच्या किंमतीतून १८,९९९ रुपये कमी केले जातील, म्हणजेच हा फोन १,००० रुपयांना मिळेल.