1 / 6बहुचर्चित असलेल्या रिअलमी १५ मालिका बाजारात कधी दाखल होईल, याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीचे दोन नवे स्मार्टफोन रिअलमी १५ 5G आणि रिअलमी १५ प्रो 5G येत्या २४ जुलै २०२५ रोजी बाजारात दाखल होणार आहे. 2 / 6रिअलमी १५ प्रो 5G मध्ये नवीन कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामुळे फोनला खास लूक मिळतो. लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनचे फोटो आणि अधिकृत पोस्टर्सवरून दिसत आहे की, या स्मार्टफोनची जाहीरात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल करणार आहे.3 / 6हा फोन फोन व्हेल्व्हेट ग्रीन, सिल्क पिंक आणि सिल्क पर्पल अशा आकर्षक रंगामध्ये लॉन्च केला जाईल, जो तरूणांना लक्षात घेऊन डिझाइन केला गेला आहे, असे म्हटले जात आहे.4 / 6कंपनीने स्पेसिफिकेशनबाबत अधिकृत माहिती घोषणा केली नाही. परंतु, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ४ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. 5 / 6कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.6 / 6हा फोन ६ जीबी रॅम, ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅमसह बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.